Dhananjay Munde कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात दोषी? मोठा धक्का, न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?
वांद्रे कोर्टात हे प्रकरण सुरू होतं. धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी सिद्ध झाले आहेत. करुणा शर्मा यांनी याचिका केली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे दोषी

करूणा शर्मा यांना मोठा दिलासा
Beed Crime News : बीडमध्ये झालेलं संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यासह अनेकांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंध असल्याचं दिसतंय. त्यामुळे तपासावर प्रभाव पडू नये म्हणून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी वेगवेगळ्या स्तरातून होतेय. त्यातच आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखीच वाढ होण्याची शक्यता आहे. करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप कोर्टाने मान्य केले असल्याची चर्चा आहे.
हे ही वाचा >> Beed : वाल्मिकच्या समर्थकांनी ज्याला बेदम मारलं तो बीड पोलिसांचा 'होमगार्ड', धक्कादायक माहिती समोर
धनंजय मुंडेंना घरगुती हिंसाचार प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. वांद्रे कोर्टात हे प्रकरण सुरू होतं. करुणा शर्मा यांनी याचिका केली होती. त्यानुसार वांद्रेमधील फॅमिली कोर्टानं हा निर्णय दिला. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांना करूणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये द्यावे लागणार आहेत.
अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया
"करुणा मुंडे या फैमिली कोर्टात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी.
हे ही वाचा >> बीडमध्ये हे चाललंय तरी काय? वाल्मिक कराडच्या बातम्या पाहणाऱ्या तरुणाला तुफान मारहाण
करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि १,२५,००० रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत."