Dhananjay Munde : "धनंजय मुंडे उद्या राजीनामा देणार", फेसबूक पोस्टमुळे चर्चांना उधान
राज्यात उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार असून, आता पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज्यात उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

"अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे राजीनामा"

"उद्या 3 मार्चला धनंजय मुंडे राजीनामा देणार"
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात काल एक मोठी माहिती समोर आली आहे. सीआयडीने संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात चार्च शीट दाखल केली असून, वाल्मिक कराड हाच मुख्य सुत्रधार असल्याचा दावा सीआयडीने केला आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराड याच्या अडचणी वाढल्या असून, तो मंत्री धनंजय मुंडे यांचा नीकटवर्तीय असल्यानं पर्यायाने धनंजय मुंडे यांच्याही अडचणी वाढणार का हे पाहणं महत्वाचं असेल. त्यातच करूणा मुंडे यांनी केलेल्या एका पोस्टमुळे चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
हे ही वाचा >>"आरोपींना कोर्टाकडून कठोर शिक्षा...", CM देवेंद्र फडणवीस संतोष देशमुख हत्याप्रकरणी नेमकं काय म्हणाले?
राज्यात उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार असून, आता पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. करूणा मुंडे यांनी थेट तारीख लिहून "3-3-2025 को राजी नामा होगा" असं म्हटलं आहे. अधिवेशनाच्या आधीच अजित पवार त्यांचा रैाजीनामा घेतील असं त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या आहे. वाल्मिक कराड सरेंडर झाला होता तेव्हा तोच म्हणाला होता की, जे दोषी असतील त्यांना शिक्षा व्हावी, त्यामुळे मला वाटतं फाशी झाली पाहिजे असं करूणा मुंडे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, दुसरीकडे काल वाल्मिक कराडला मुख्य आरोपी केल्यानंतर सुरेश धस यांनीही आक्रमक भूमिका घेत आपली प्रतिक्रिया दिली. "वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड, मुख्य सूत्रधार, याचा आका.. सगळं काही तोच आहे. हा आकाच सगळं काही करत होता. संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये यांनी धुमाकूळ घातला होता. जे गुंड प्रवृत्तीचे लोकं आहेत यांना सहकार्य करणं, मदत करणं, पैसे देणे... कारण पैसा जास्त झाला ना. बोगस पैसे उचलायचे आणि या अशा गँग तयार करायच्या, या टोळ्यांना अभय द्यायचं यांच्याकडून हवी ती कामं करून घ्यायची. अशा पद्धतींचा उद्योग यांचा संपूर्ण जिल्ह्यात सुरू होता. SIT ने जे मांडलंय ते योग्य आहे. मूळ सूत्रधार हा वाल्मिक कराड आहे आणि बाकीचे प्यादे आहेत. तीनही केसची जंत्री एकत्रित एसआयटीने केल्याचं दिसतंय. कलम 34 प्रमाणे सामूदायिक जबाबदारी सगळ्यांची आहे. म्हणजे खून करायला जरी प्रत्यक्षात त्या जागेवर वाल्मिक कराड नसला तरी वाल्मिक कराडच्याच आदेशवर खून झालाय. त्यामुळे मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच आहे. दोन नावं वगळली असं म्हटलं जात आहे. जर त्यांचा संबंध नसेल तर ती नावं वगळली असतील. त्याबद्दल आमचं काही मत नाही. परंतु आमचं जे देशमुख कुटुंब आहे आणि आम्ही जे आहोत यामध्ये जे पोलीस आहे.. महाजन आणि राजेश पाटील या लोकांचा त्यात सहभाग आहे. कदाचित पुरवणी आरोपपत्र दाखल करायची वेळ आली तर ते करावं. त्यात पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करावं अशी आमची मागणी मुख्यमंत्र्यांकडे असणार आहे." असं धस म्हणालेत.