Dhananjay Munde यांच्या राजीनाम्यानंतर कुणाची अडचण, कुणाला संधी, मंत्रिपद कुणाला?
Dhananjay Munde Resignation : संतोष देशमुख यांची हत्या करताना घडलेल्या संपूर्ण राक्षसी कृत्याचे फोटो पाहिल्यानंतर महाराष्ट्र संतापला. अत्यंत निघृणपणे संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली, छळ करण्यात आला. तसंच त्यांच्या मृतदेहासोबतही विटंबाणा केली गेली असल्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

धनंजय मुंडेंचा राजीनामा, पंकजांची आक्रमक भूमिका

देेवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय म्हणाल्या पंकजा?

अजित पवार यांच्यासमोरच्या अडचणी कशा वाढल्या?

छगन भुजबळ की प्रकाश सोळंके, संधी कुणाला मिळणार?
Dhananjay Munde Resigns : धनंजय मुंडे त्यांच्या राजकीय कारकीर्दीत अनेकदा वादात सापडले आहेत. सध्या मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर, ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता, त्यातल्या अनेकांनाही आपल्या निर्णयाबद्दल विचार करावा लागतोय. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांची या संपूर्ण प्रकरणावरची भूमिका सुद्धा विचार करायला लावणारी आहे.
फडणवीसांनी राजीनामा द्यायला सांगितला?
अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितल्याचं म्हटलं जातंय, मात्र त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना ठोस भूमिका घ्यावी लागली. अशीही चर्चा आहे की, त्यांनी राजीनामा दिला नसता, तर मुख्यमंत्री त्यांना बडतर्फ करून राज्यपालांकडे राजीनामा पाठवणार होते असंही समोर आलंय.
धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित वादांची यादी मोठी आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय गंभीर आहे. वाल्मिक कराडचा या प्रकरणात संबंध आल्यापासून धनंजय मुंडेंच्या राजीनामाच्या मागणी होत होती.
हे ही वाचा >> Kolhapur : पत्नीसोबतचा वाद टोकाला, पतीनं पोलीस स्टेशनमध्येच स्वत:ला पेटवून घेतलं, थरार कॅमेऱ्यात कैद
मनोज जरांगे यांनी म्हटलंय की, फक्त राजीनामाच नाही तर, त्यांचं विधानसभा सदस्यत्वही रद्द करा, तसंच त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हाही दाखल करावा असंही ते म्हटले आहे.
मंत्रिमंडळातच घ्यायला नको होतं : पंकजा मुंडे
पंकजा मुंडे यांनीही या प्रकरणात अत्यंत टोकाची भूमिका घेत, धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातच समाविष्ट करायला नको होतं... किमान त्यांना या त्रासातून आणि अपमानातून वाचता आलं असतं, असं म्हणत त्यांनी अनेकांना चक्रावून सोडलंय.
पंकजा मुंडे म्हणाल्या, तपास सखोल व्हावा, मला वाटतं की धनंजय मुंडेंनी खूप आधीच राजीनामा द्यायला हवा होता. पोलीस चौकशी करत आहेत, त्यामुळे कळेलच की कोण-कोण प्रकरणात सामील आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडेंनी शपथच घ्यायला नको होती, असं पंकजा मुंडे यांच्या या भूमिकेचा अर्थ नेमका काय याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. अजित पवारांच्या सल्ल्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना मंत्री केलं हे खरं आहे, पण जबाबदारी फडणवीसांवरच आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
हे ही वाचा >>Pune: काकूसोबत अनैतिक संबंध, पण अचानक बिबट्याच्या हल्ल्याचा अँगल का आला मधे?
पंकजा मुंडे पुढे असंही म्हणाल्या की, 'सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिणारी मी पहिली व्यक्ती होती. धाकटी बहीण असल्यानं, धनंजयला त्रास सहन करावा लागला याचं मला वाईट वाटलं... पण, माझा प्रश्न असा आहे की, वरच्या लोकांनी त्याला मंत्री का बनवलं?’
पंकजा मुंडेंसाठी धनंजय मुंडे हे फक्त निमित्त असून, त्यांचं लक्ष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत का असाही सवाल उपस्थित होतोय. सध्या पंकजा मुंडे मंत्री असल्या तरी, पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्ष काही वर्षांपूर्वी एवढा वाढला होता की, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतरच्या काळात, केंद्रीय नेतृत्वानं पंकजा यांना संघटनात्मक कामासाठी दिल्लीला बोलावलं होतं.
अजित पवारांची अडचण, कोण होणार मंत्री?
धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून मंत्री झाले होते. त्यामुळे आता त्यांच्या जागी कोणाला मंत्री बनवलं जाईल? यावर सर्वांचं लक्ष आहे.
अजित पवारांवरही या प्रकरणानंतर अप्रत्यक्षपणे राजकीय दबाव आहे. कारण, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली होती, मात्र उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला म्हणून ते सध्या मंत्रिमंडळात आहेत.
महायुतीचे सरकार स्थापन झालं, तेव्हा छगन भुजबळ हे देखील मंत्रिपदाचे दावेदार होते. त्यांनी मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजीही व्यक्त केली होती. 2023 च्या राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांऐवजी अजित पवारांसोबत उभे राहिलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये छगन भुजबळ यांचं नाव पहिलं आहे. मुंडेंप्रमाणेच भुजबळ सुद्धा ओबीसी समाजाचा एक मोठा चेहरा आहेत. तर दुसरीकडे बीडच्या माजलगावचे आमदार प्रकाश साळुंके हे देखील मंत्रिपदाचे दावेदार मानले जात आहेत.