Maharashtra HSC Result 2023 : बारावीच्या निकालाची तारीख ठरली, ‘या’ दिवशी लागणार निकाल

मुंबई तक

Maharashtra 12th Result 2023 Date And Time : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या 25 मे 2023 रोजी लागणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल उद्या दुपारी 2 वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra hsc result will be declared tomorrow result can be seen on this website
Maharashtra hsc result will be declared tomorrow result can be seen on this website
social share
google news

Maharashtra 12th Result 2023 Date And Time : बारावीच्या (HSC Result 2023) विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा (HSC Result) निकाल उद्या 25 मे 2023 रोजी लागणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल उद्या दुपारी 2 वाजल्यापासून बोर्डाच्या (Maharashtra Board) वेबसाईटवर पाहता येणार आहे. या संबंधित वेबसाईटच्या लिंक खाली देण्यात आल्या आहेत. दरम्यान निकालाची तारीख समोर आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.(hsc result 2023 will be declared tomorrow result can be seen on this website)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापुर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी आणि मार्च 2023 या महिन्यात 12 वीची परीक्षा (Hsc Exam) घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी यंदाच्या वर्षी 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले होते. या विद्यार्थ्यांमध्ये 7 लाख 92 हजार 780 मुलांचा समावेश होता, तर 6 लाख 64 हजार 441 मुलींचा समावेश होता. मधल्या 2 वर्षाच्या कोविड काळात विद्यार्थ्यांना परीक्षा देता आल्या नव्हत्या. कोरोना महामारीनंतर सर्व सुरळीत झाल्यानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन वर्ग घेऊन बारावीची परीक्षा (Hsc Exam) पार पडली होती. बारावीची ही परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 दरम्यान घेण्यात आली होती.

कधी लागणार निकाल?

दरम्यान आता मोठ्या प्रतिक्षेनंतर बारावीच्या परीक्षेची (HSC Result)  तारीख समोर आली आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या गुरूवारी 25 मे 2023 ला दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहिर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खालील दिलेल्या वेबसाईटवरून (Website) दुपारी 2 वाजल्यानंतर निकाल पाहता येणार आहेत. या संबंधित परीपत्रक काढून बोर्डाने निकालाची माहिती दिली आहे.

कुठे पाहाल निकाल?

बारावी परीक्षेचा (Hsc Result) निकाल उद्या दुपारी 2 वाजता जाहिर होणार आहे. हा निकाल बारावीच्या विद्यार्थ्यांना mahresult.nic.in, http://hsc.mahresults.org.in, http://hscresult.mkcl.org या संकेत स्थळावर पाहता येणार आहेत. दरम्यान आता तारीख जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे.

असा पाहा निकाल?

  • mahresult.nic.in,http://hsc.mahresults.org.in, http://hscresult.mkcl.org या या वेबसाईटवर जा.
  • होमपेजवर HSC Result 2023 च्या लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर तुमचा सीट नंबर टाका आणि सबमीटवर क्लिक करा.
  • सबमीटनंतर तुमचा बारावीचा निकाल तुम्हाला स्क्रिनवर मिळणार आहे.

‘या’ वेबसाईटवर निकाल पाहा
mahresult.nic.in
http://hsc.mahresults.org.in
http://hscresult.mkcl.org

हे वाचलं का?

    follow whatsapp