Jitendra Awhad : "सुरेश धस यांना मराठा समजात फूट पाडायला आणि जरांगेंना कापायला पाठवलंय"
जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले, मिडिया स्पेसची मला गरज नाही. अचानक माझे इन्स्टापेज सुरू होता नाही, ढोल वाजवताना, मान हालवताना....मी आहे तो परफेक्ट आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

"सुरेश धसांना मराठा समाजात फूट पाडायला पाठवलंय"

सुरेश धशांवर बोलताना जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

सुरेश धस यांच्यावर सडकून टीका
Jitendra Awhad Vs Suresh Dhas : मराठा समाजात फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलंय, जरांगेंना कापायला पाठवलंय असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. परभणीतून निघालेल्या लाँग मार्चमध्ये सहभागी आंदोलकांशी संवाद साधताना सुरेश धस यांनी पोलिसांना माफ करा असं वक्तव्य केलं होतं. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता सुरेश धस यांनीही उत्तर दिलं होतं. त्याला पुन्हा उत्तर देत आव्हाडांनी धसांवर हल्लाबोल केला आहे.
हे ही वाचा >> Sambhajinagar : शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची पोलिसांना धक्काबुक्की, हॉटेल चालकाला मारहाण
सुरेश धस यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका करताना म्हटलं होतं, की आव्हाड सोमनाथच्या नावानी आले आणि अक्षय शिंदेंचं गुणगाण गायलं. तसंच आव्हाडांना मोर्चाच पाहिजे असेल तर तिकडे ठाण्यात काढावा असं सुरेश धस म्हणाले होते. त्याला आव्हाडांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. सुरेश धस यांच्या 'पोलिसांना माफ करण्याबद्दलच्या वक्तव्याला' सोमनाथच्या आईने माऊलीने उत्तर दिलंय. त्या माऊलीला सलाम.
हे ही वाचा >>Tanaji Sawant Son : सावंतांचा लेक कुठून उडाला कुठे लँड झाला? नाट्यमय घटनेचा घटनाक्रम 10 मुद्द्यांमध्ये
"अक्षय शिंदेचं मी गुणगाण गायलं नाही, तो गुन्हेगार असेल तर शिक्षा होईल. आम्ही म्हणत नाही खून झाला, न्यायाधीशांना सांगितलं की एन्काऊंटर नाही. शाळेतलं सीसीटीव्ही कुठे गेलं? का नाही आपटेची चौकशी झाली? का ती केस रजिस्टर नाही झाली?" असा सवाल आव्हाड यांनी केला.
जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले, मिडिया स्पेसची मला गरज नाही. अचानक माझे इन्स्टापेज सुरू होता नाही, ढोल वाजवताना, मान हालवताना....मी आहे तो परफेक्ट आहे. आपलं काम आपल्या पद्धतीनं करा. तुमचं काम एवढंच की जरांगेंना कापायचं, मराठा समाजात फूट पाडायची. हे लोकांना कळत नाही का? असं आव्हाड म्हणाले.