Saif Ali Khan : सैफच्या हल्ल्याला महिना पूर्ण झाल्यानंतर करीनाची पोस्ट; म्हणाली, लग्न, मुलं, घटस्फोट...

मुंबई तक

'लग्न, घटस्फोट, मुलं...याबद्दल काय म्हणाली करीना? काही दिवसांपूर्वीच करीना आणि सैफने माध्यमांना त्यांच्या मुलांचे फोटो न काढण्याची आणि त्यांना प्रायव्हसी देण्याची विनंती केली होती. सैफवरील हल्ल्यानंतर त्याने हा निर्णय घेतलाय.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर करीनाची पहिली पोस्ट

point

लग्न, मुलं, घटस्फोटाबद्दल काय म्हणाली करीना?

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याला आला महिना उलटला आहे. या घटनेमुळे करीनाच्या आयुष्यातही मोठं संकट निर्माण झालं होतं. त्यानंतर आता करीना आणि सैफ मुलांसोबत कुटुंबाचा वेळ घालवतेय. तसंच करगिनाने आता एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे तिचे चाहते गोंधळात पडले आहेत.

करीनाने या पोस्टमध्ये लिहिलंय, 'लग्न, घटस्फोट, बाळंतपण, पालकत्व म्हणजे काय हे तुमच्यासोबत घडेपर्यंत तुम्हाला कधीच समजणार नाही.' अंदाज लावणं म्हणजे वास्तविकता नसते. आयुष्य तुम्हाला ते सांगेपर्यंत तुम्हाला वाटतं की तुम्ही लोकांपेक्षा फार हुशार आहात.' करीनाने ही पोस्ट हार्ट इमॉजिसह शेअर केली आहे.

मुलांना माध्यमांपासून दूर ठेवायचंय

काही दिवसांपूर्वीच करीना आणि सैफने माध्यमांना त्यांच्या मुलांचे फोटो न काढण्याची आणि त्यांना प्रायव्हसी देण्याची विनंती केली होती. सैफवरील हल्ल्यानंतर त्याने हा निर्णय घेतलाय.

सैफने पुन्हा सुरू केलं काम 

हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या सैफ अली खान आता कामात सक्रिय झाला आहे. काही दिवसांपूर्वीच तो त्याच्या आगामी 'द ज्वेल थीफ' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. यावेळी त्यांनी सांगितलं की, सर्वांसमोर येऊन त्याला खूप आनंद झालाय. तो असंही म्हणाला की, तो प्रेक्षकांना हा प्रकल्प दाखवण्यास खूप उत्सुक आहे आणि सर्वांना तो खूप आवडेल.

करीनाबद्दल बोलायचं झाल्यास ती आता मेघना गुलजार निर्मित 'दायरा' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात करिनासोबत आयुष्मान खुराणा मुख्य भूमिकेत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp