Kareena Kapoor Video : घाबरलेली करीना आली, सगळ्यात आधी कुणाशी बोलली, व्हिडीओमध्ये नेमकं काय?

मुंबई तक

पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. त्यानंतर आता सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओची चर्चा होत आहे. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली

point

करीना कपूर घाबरली, महिलेला काय म्हणाली?

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर धारदार शस्त्राने हल्ला झाल्यानं तो गंभीर जखमी झाला असून, त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सात पथकं रवाना केली आहेत. गुरुवारी पहाटे सैफ अली खानवर घरात घुसलेल्या व्यक्तिकडून धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. चोरीच्या उद्देशानं घरी आलेल्या आरोपीने सैफवर चाकूने हल्ला केला. पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. त्यानंतर आता सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओची चर्चा होत आहे. 

एका व्हिडीओ समोर आला असून, करीना कपूर खान घाबरलेली दिसतेय. या घटनेनंतर पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, करीना कपूर काळजीत दिसतेय. तिच्या आजूबाजूला उभे असलेले लोक काहीतरी बोलत असल्याचं दिसून येतंय. यामुळे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.

हे ही वाचा >> Saif Ali Khan Live Updates : चाकू हाडापर्यंत गेला, डॉक्टरांनी सांगितलं शस्त्रक्रिया कशी केली? सैफ धोक्याच्या बाहेर?

मुंबई पोलिसांनी सैफच्या घरात काम करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतलं आहे.   त्यांची चौकशी सुरू आहे. सैफच्या घरात घुसलेल्या एका अज्ञात व्यक्तीनं त्याच्यावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. सध्या या सैफवर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू. पोलिसांनी तपास सुरू केला असून, वांद्रे पोलिस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

 

डॉ. लीलावती हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी निरज उत्तमानी म्हणाले, “सुदैवाने, सैफ अली खान यांची शस्त्रक्रिया खूप चांगल्या प्रकारे झाली आहे. तो बरा होत आहे, ऑपरेशन संपलं आहे आणि त्याला आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे. एक-दोन दिवसांत त्याला जनरल वॉर्डमध्ये हलवले जाईल. त्यानंतरही, त्याला काळजी घ्यावी लागेल. जखमा जास्त खोल होत्या, पण आमच्या डॉक्टरांनी आणि वैद्यकीय पथकाने चांगल्या प्रकारे उपचार केले आहेत.”

हे ही वाचा >>Saif Ali Khan House CCTV Video : हल्ला होण्यापूर्वी 2 तास कुणी आत आलंच नाही? पोलिसांना काय आढळलं?

मुंबईतील लीलावती रुग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे म्हणाले, “श्री सैफ अली खान यांना आज पहाटे 3.00 वाजताच्या सुमारास दाखल करण्यात आले. त्याच्या मणक्यात चाकू घुसल्यामुळे त्याच्या मणक्याला मोठी दुखापत झाली. चाकू काढण्यासाठी आणि गळणारे स्पाइनल फ्लुइड दुरुस्त करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या डाव्या हाताला आणि मानेला उजव्या बाजूला आणखी दोन खोल जखमा होत्या. ज्या डॉ. लीना जैन यांच्या नेतृत्वाखालील प्लास्टिक सर्जरी टीमने दुरुस्त केल्या. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास कुडवा यांनीही त्यांच्यावर लक्ष ठेवलं. तो आता पूर्णपणे स्थीर आहे आणि धोक्याबाहेर आहे. आम्ही उद्या सकाळी आयसीयूमधून बाहेर पडू आणि एक-दोन दिवसांत डिस्चार्जची योजना आखू. लीलावती हॉस्पिटलचे स्थायी विश्वस्त श्री प्रशांत मेहता म्हणाले, "श्री सैफ अली खान यांची प्रकृती सुधारत आहे."

हे वाचलं का?

    follow whatsapp