Ladaki Bahin Yojana: आधार कार्डचं 'हे' काम आताच करुन घ्या! तरच मिळतील लाडकी बहीण योजनेचे पैसे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ladaki Bahin yojana Latest News
Ladaki Bahin yojana Latest News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलांनाे! हे काम केलं नसेल, तर लाडकी बहीण योजनेचा मिळणार नाही लाभ

point

लाडकी बहीण योजनेची मोठी अपडेट आली समोर

point

आधार कार्ड संबंधीत महत्त्वाची माहिती जाणून घ्या

Ladaki Bahin yojana Latest News : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोट्यावधी महिलांनी अर्ज केले. १ जुलैपासून या योजनेची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जवळपास दीड कोटी पात्र महिलांना योजनेचा पहिला हफ्ता मिळल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. परंतु, काही महिलांच्या बँक खात्यात पैसे अजूनही जमा झालेले नाहीत. कारण महिलांचं बँक खातं आधार कार्डसोबत लिंक नाहीय. 

ADVERTISEMENT

महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डला बँक खात्याशी लिंक करणं आवश्यक आहे. त्यामुळे ज्या महिलांनी या योजनेच्या अंतर्गत अर्ज केलं आहे, त्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही, हे तपासून पाहावं. जर लाडकी बहीण योजनेसाठी आधारकार्ड लिंक नसेल, तर तातडीनं आधार कार्ड लिंक करुन घ्या. कारण सरकारकडून देण्यात येणारी रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आज आम्ही तुम्हाला आधार कार्ड लिंकसंदर्भात माहिती देणार आहोत.(

हे ही वाचा >> Devendra Fadnavis: "नारायण राणे कुणाला धमक्या..."; राजकोटच्या राड्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस कडाडले

1) लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्डसोबत बँक खातं लिंक होणं आवश्यक आहे.
2) या योजनेच्या माध्यमातून सर्व लाभार्थी महिलांना बँक खात्यात डीबीटी माध्यमाद्वारे आर्थिक सहायत्ता रक्कम पाठवण्यात येईल.
3) लाडकी  बहीण योजना आधार कार्ड लिंकच्या माध्यमातून मिळणारी रक्कमेतून महिला गुंतवणूकही करु शकतात.
4) राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे.
5) आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात या योजनेचे पैसे जमा होतील.
6) आधार कार्डसोबत बँक खातं लिंक केलं आहे की नाही, याबाबत तुम्हाला माहित नसेल, तर UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हे तपासून घ्या

हे वाचलं का?

 

हे ही वाचा >> Uddhav Thackeray: "येत्या रविवारी...", राजकोट किल्ल्यावर राडा झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सरकारला दिला 'हा' इशारा

'ही' कागदपत्रे असतील तरच तुम्ही आधारकार्डला बँक खात्याशी लिंक करू शकता

१) आधार कार्ड
२) पॅन कार्ड
३) रहिवासी दाखला
४) उत्पन्नाचा दाखला
५) जातीचा दाखला
६) मोबाईल नंबर
७) बँक खातं पासबुक
 

ADVERTISEMENT

"लाडकी बहीण योजना मतं मिळवण्यासाठी सुरु केली नाही. महिलांना सन्मान मिळाला पाहिजे. त्यांना त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. लाडकी बहीण योजनेमुळं विरोधी पक्षाचं टेन्शन वाढलं आहे. सरकारकडून महिन्याला फक्त १५०० रुपये दिले जात आहे. सरकार एव्हढ्यावरच थांबणार नाही. महिलांनी महायुती सरकारला मजबूत केलं पाहिजे. जेणेकरून या योजनेची रक्कम ४ हजार रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. जर काँग्रेस सत्तेत असती, तर भष्ट्राचारामुळं लोकांना ३ हजार रुपयांऐवजी फक्त ४०० रुपयेच देण्यात आले असते. पण महायुती सरकारला कल्याणकारी योजनांसोबतच महिलांना सक्षम बनवायचं आहे. महिलांना लखपती बनवायचं आहे," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिलीय. 

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT