IMD Rain Alert : महाराष्ट्रात 'या' शहरात कोसळणार पावसाच्या सरी? पावसाची आजची स्थिती जाणून घ्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात या भागात कोसळणार पावसाच्या सरी

point

भारतीय हवामान विभागाने ट्वीटरवर दिली महत्त्वाची अपडेट

point

महाराष्ट्रातील पावसाची सध्याची स्थिती जाणून घ्या

Maharashtra Rain Update: जुलै महिन्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्यानं राज्यभर पूरस्थिती निर्माण झाली होती. परंतु, ऑगस्ट महिना सुरु झाल्यापासून पावसाचा जोर मंदावला आहे. भारतीय हवामान विभागाकडून (IMD) सध्याच्या पावसाच्या स्थितीबद्दल माहिती दिली जाते. राज्यात कोणत्या भागात रेड अलर्ट, येलो आणि ऑरेंज अलर्ट असेल, याबाबतचा अंदाज आयएमडीकडून बांधला जातो. राज्यातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. परंतु, मुंबईत पावसाची सध्याची स्थिती काय आहे, याबाबत हवामान विभागाने ट्वीटरवर माहिती शेअर केलीय.  मुंबई शहर आणि उपनगरात पुढील २४ तास मध्यम पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

ADVERTISEMENT

भारतीय हवामान विभागाने ट्वीटरवर दिली माहिती

हवामान विभागाने ट्वीटरवर दिलेली माहिती अशी की, पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज.
शहर आणि उपनगरात मध्यम पावसाच्या शक्यतेसह सामान्यतः ढगाळ आकाश राहील. रात्री/पहाटे मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१°C आणि २६°C च्या आसपास असेल.

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत बहुतेक ठिकाणी तुरळक पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT


 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT