Manoj Jarange : "आरोपींना पाठबळ देणारे मुख्यमंत्र्यांसोबत चहा पितायत...", कराड शरण, धनंजय देशमुख, जरांगे काय म्हणाले?

मुंबई तक

वाल्मिक कराड याच्यावर सध्या राज्याचं लक्ष लागून असतानाच आता वाल्मिक कराड आता शरण आला आहे. याप्रकरणातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट असून, यापुढे होणाऱ्या सर्व कारवाईवर आता राज्याचं लक्ष असणार आहे. याबद्दलच चर्चा करण्यासाठी संतोष देशमुख

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वाल्मिक कराड CID ला पुण्यात शरण

point

तब्बल 20 दिवसानंतर कराड शरण

point

कराड शरण आल्यानंतर जरांगे, धनंजय देशमुख काय म्हणाले?

Manoj Jarange Dhananjay Deshmukh : आरोपीची पाठराखण करणारे मुख्यमंत्र्यांसोबत चहा पितायत असं म्हणत मनोज जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्‍यांना विनंती आहे की, कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. देशमुख कुटुंब घाबरलेलं आहे, कारण समोरचे गुंड आहेत. त्यांच्या घरातल्या प्रत्येकाला आजीवन संरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केला. मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यानंतर जरांगे आणि देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. वाल्मिक कराडचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाले जरांगे? 

हे ही वाचा >> Sandhy Sonawane : Walmik Karad यांच्याशी काय संबंध? CID चौकशी का झाली? संध्या सोनवणे यांनी स्पष्ट सांगितलं
 

तुम्ही सापळा रचला का? आरोपी प्रतिक्रिया कशी देतोय? आरोपी म्हणतो माझा संबंध नाही? बाकीचे आरोपी कुठे आहेत? हा मारणाऱ्या लोकांशी बोलला आहे. मारणारे लोक यांच्याशी बोललेत का? हा कोणत्या मंत्र्‍यांशी बोलला? सरकारशी बोलला का? असे सवाल करत मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सगळा समाज आक्रमक झाला असताना, हा अशा प्रतक्रिया देतोय. तुम्ही दिशाभूल करायची ठरवली आहे का? असा सवालही जरांगेंनी केला. आरोपी जेलमध्ये सडले पाहिजे, यातला एकही आरोपी सुटला तर त्यावळी राज्य बंद पडेल असं समजा असं म्हणत मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. 

हे ही वाचा >> Jitendra Awhad : "वाल्मिक कराड शानमध्ये, कडक कपडे घालून पुण्यातील...", जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टमुळे खळबळ

धनंजय देशमुख काय म्हणाले?

आम्ही मागणी करत होतो की, आरोपीला अटक करुन  शिक्षा करा. बाकीचे आरोपी असतील त्यांनाही पकडा. सहआरोपींनाही पकडा. मुख्यमंत्री फडणवीसांना सर्वांना आश्वस्त केलं होतं की, आरोपींना शिक्षा देणार. त्यामुळे पुढील कारवाई सुद्धा लवकरात लवकर करा असं धनंजय देशमुख म्हणाले. सत्य समोर येईल, त्यासाठी थोडा वेळ लागेल, पण यंत्रणेचे प्रयत्न सुरू आहेत असं देशमुख म्हणाले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp