Palghar : काका आणि भावानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भपातही केला आणि...
तक्रारीतमध्ये मुलीनं म्हटलंय की, गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान, तिच्या भावाने आणि काकांनी तिच्याशी अनेक वेळा घृणास्पद कृत्यं केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

काका आणि भावानेच तोडले अब्रूचे लचके

वर्षभर बलात्कार केला, मुलगी गर्भवती राहिली

पालघरमध्ये घडली संतापजनक घटना
पालघरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर काका आणि भावानेच बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. यानंतर, पीडिता गर्भवती राहिल्यावर तिला गर्भपात करण्यासही भाग पाडण्यात आलं. पीडितेने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
पालघरमध्ये घडलेल्या या घटनेत पोलिसांचं म्हणणं आहे की, एका 16 वर्षीय मुलीवर तिच्या भावाने आणि काकांनी वारंवार बलात्कार केला. या काळात मुलगी गर्भवती सु्द्धा राहिली. जेव्हा आरोपींना हे कळलं, तेव्हा त्यांनी मुलीला वैद्यकीय तपासणी करुन तिचा गर्भपात केला.
हे ही वाचा >> Pune Crime : वाढदिवस साजरा करताना झाला वाद, रागात गोळीबार केला, एकाचा अंत झाला
तक्रारीतमध्ये मुलीनं म्हटलंय की, गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान, तिच्या भावाने आणि काकांनी तिच्याशी अनेक वेळा घृणास्पद कृत्यं केली. या काळात, जेव्हा ती गर्भवती राहिली, तेव्हा आरोपी काकाने किशोरीला गर्भपातासाठी मुंबईतील ग्रँट रोडवरील एका दवाखान्यात नेलं.
दरम्यान, या प्रकरणाबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपीविरुद्ध बलात्कार, गर्भपात, धमकी आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर, मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांनी आरोपी असलेल्या भाऊ आणि काकाला अटक केली. दोघांच्या वयाबद्दल मात्र, माहिती समोर आलेली नाही.
हे ही वाचा >> Russian Beer वर महात्मा गांधी, मदर तेरेसांचा फोटो? खरे की खोटे? वाचा सविस्तर...
गेल्या काही वर्षांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढतेय. अनेकदा महिला अशा गोष्टींबद्दल तक्रार करण्यास घाबरतात. मात्र, त्यामुळे आरोपींचं मनोबल वाढत जात असल्याचं अशा गुन्ह्यांमधून समोर आलं आहे.