Nitesh Rane on Saif Ali Khan : सैफ अली खानवर खरंच हल्ला झाला की फक्त अ‍ॅक्टींग? काय म्हणाले राणे?

मुंबई तक

Saif Ali Nitesh Rana Controversy:मंत्री नितेश राणे यांनीही आपलं मत व्यक्त केलं आणि काही सवाल उपस्थित केले. सैफ अली खानवर खरोखरच चाकूने हल्ला झाला की सैफ अली खानने फक्त अभिनय केला? अशी शंका येत असल्याचं नितेश राणे म्हणाले.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सैफ अली खान यांच्याबद्दल नितेश राणेंचा सवाल?

point

संजय निरूपम यांच्यानंतर राणेंकडूनही शंका

point

आव्हाड, सुप्रिया सुळेंवर आळंदीमधून टीका

Saif Ali Khan Attack Updates: सैफ अली खानवर खरंच चाकूने हल्ला करण्यात आला आहे की तो फक्त अॅक्टींग करत होता? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule on Saif Ali Khan) आणि जितेंद्र आव्हाड यांनी कधीही हिंदू कलाकारांची पर्वा केली नाही, त्यांना फक्त खान कलाकारांची काळजी आहे असाही आरोप नितेश राणे यांनी केला आहे. सैफ अली खान यांच्यावर 16 जानेवारीला हल्ला झाला होता. त्यानंतर मंगळवारी 21 जानेवारीला तो रुग्णालयातून घरी आला. त्यावेळी एकदमच साधारण पद्धतीनं एखाद्या फीट व्यक्तिसारखा चालत आला, त्यामुळे अनेकांनी त्याच्यावरील हल्ल्यावर शंका उपस्थित केली आहे. शिवसेना नेते संजय निरुपम यांनीही अशीच शंका उपस्थित केली आहे.

मंत्री नितेश राणे यांनीही आपलं मत व्यक्त केलं आणि काही सवाल उपस्थित केले. सैफ अली खानवर खरोखरच चाकूने हल्ला झाला की सैफ अली खानने फक्त अभिनय केला? अशी शंका येत असल्याचं नितेश राणे म्हणाले. "तो असा चालत आला की, मला संशय आला. असं टूनटून करुन हसतं ते" असा टोला राणेंनी मारला. तसंच यावेळी त्यांनी सैफ अली खानबद्दल बोलणाऱ्या सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावरही निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांनी कधीही हिंदू कलाकारांची पर्वा केली नाही. त्यांना फक्त खान कलाकारांची काळजी आहे असं म्हणत नितेश राणे यांनी पुण्यातील आळंदीमध्ये बोलताना ही शंका व्यक्त केली. 

हे ही वाचा >> Pushpak Train Accident LIVE Updates : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, अनेक प्रवाशांचा मृत्यू, नेमकं घडलं तरी काय?

नितेश राणे म्हणाले, बांगलादेशी सैफ अली खानच्या घरात घुसले! पूर्वी ते मुंबईमध्ये राहत होते, आता ते घरी घुसत आहेत. ते कदाचित सैफ अली खानला घ्यायला आला असतील. आज सैफ अली खानला पाहिल्यानंतर मला संशय आला. जर चाकूने खरोखरच वार झालेत की तो अभिनय करतोय? ते पुढे म्हणाले, जेव्हा एखादा खान अडचणीत असतो. तेव्हा सगळेच बोलायला लागतात. पण सुशांत सिंग राजपूतचं काय झालं? 

नितेश राणे म्हणाले, सुशांतसिंह राजपूतच्या वेळी जितेंद्र आव्हाड पुढे आले नाहीत. बारामतीची ताई बाहेर आली नाही. सुप्रिया सुळे यांना सैफ अली खानची काळजी वाटते. शाहरुख खानला त्याच्या मुलाची काळजी वाटते. मला नवाब मलिकची काळजी वाटते. तुम्ही कधी त्यांना कोणत्याही हिंदू कलाकाराबद्दल काळजी करताना ऐकले आहे का? असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला आहे. पुढे ते असंही म्हणाले की, "वीर सावरकरांनी म्हणाले होते, मुस्लिम नाही तर हिंदूच हिंदूंचे शत्रू आहेत."

हे ही वाचा >> Jalgaon Train Accident Video: जळगावात रेल्वे दुर्घटना! आगीच्या भीतीत ट्रॅकवर उड्या मारलेल्या प्रवाशांना बंगुळुरु एक्स्प्रेसने उडवलं!

एकूणच नितेश राणे यांनी ही शंका उपस्थित केल्यानंतर आता यावर राजकीय टीका टीप्पण्या केल्या जातील अशी शक्यता आहे. मात्र, सैफ अली खानच्या बाजूने यावरुन कुणी बोलणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp