No Parking No Car : पार्किंग नाही, तर कार मिळणार नाही... राज्य सरकार नवं धोरण आणण्याच्या तयारीत?

मुस्तफा शेख

वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी प्रताप सरनाईक यांचा प्रस्ताव. शहरी भागातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणाले सविस्तर वाचा.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पार्किंग नसेल, तर कार घेता येणार नाही?

point

कार विकत घेण्यापूर्वी जरूर वाचा

point

प्रताप सरनाईक यांनी सविस्तर सांगितलं

महाराष्ट्र सरकार एक नवं धोरण लागू करण्याच्या तयारीत आहे. ज्याअंतर्गत लोकांना कार खरेदी करण्यापूर्वी पार्किंगच्या असल्याचा पुरावा देणं बंधनकारक असेल. शहरी भागातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रस्तावाची घोषणा केली.

 

हे ही वाचा >> Nylon Manja Deaths : मांजा गळ्यात अडकला, थेट श्वासनलिका कापली गेली; राज्यात तिघांचा, दोन गंभीर

सरनाईक म्हणाले, दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये वाहनांची वाढती संख्या वाहतूक कोंडीचं मुख्य कारण ठरते आहे. अनेकजण त्यांच्या गाड्या सार्वजनिक रस्त्यांवर पार्क करत आहेत, कारण त्यांच्याकडे खाजगी पार्किंगची सुविधा नाही.

आपत्कालीन सेवाना अडथळा

सार्वजनिक ठिकाणी वाहनांच्या अनियंत्रित पार्किंगमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन सेवांमध्येही अडथळा येतो. अनेक सोसायट्यांमध्ये मोकळ्या जागांचा वापर पार्किंगसाठी केला जातो. ज्यामुळे आपत्कालीन सेवांच्या कामकाजात अडथळा येतो.

हे ही वाचा >> Ajit Pawar आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार?, अजितदादांनी केलं मोठं विधान

सरनाईक यांनी स्पष्ट केलं की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आम्ही विरोधात नाही. ज्यांच्याकडे खाजगी पार्किंगची सुविधा नाही ते सार्वजनिक पार्किंगमध्ये जागा आरक्षित करून कार खरेदी करू शकतात. आम्ही असं म्हणत नाही की, गरीब लोकांनी गाड्या खरेदी करू नयेत, पण त्यांना पार्किंगची व्यवस्था करावी लागेल.

हे वाचलं का?

    follow whatsapp