Pune Crime : वाढदिवस साजरा करताना झाला वाद, रागात गोळीबार केला, एकाचा अंत झाला
यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड परिसरातील देहू रोड परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचं नाव विक्रम गुरुस्वामी रेड्डी असं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुण्यात किरकोळ वादातून गोळीबार

वाढदिवस साजरा करण्यावरून वाद

गोळीबारानंतर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू
पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर रक्तरंजित संघर्षात झालं आणि एका अंत झाला. वादादरम्यान थेट गोळीबार झाल्यानं एका 37 वर्षीय व्यक्तीला गोळी लागल्यानं त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. या व्यक्तिची प्रकृती गंभीर होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा >>Russian Beer वर महात्मा गांधी, मदर तेरेसांचा फोटो? खरे की खोटे? वाचा सविस्तर...
यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड परिसरातील देहू रोड परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचं नाव विक्रम गुरुस्वामी रेड्डी असं आहे. नंदकिशोर यादव रस्त्याच्या कडेला त्यांच्या भाचीचा वाढदिवस साजरा करत असताना ही घटना घडली. दरम्यान, दोन बाईकवरून तीन-चार जण तिथे आले आणि त्यांनी सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यास आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा वाद सुरू झाला होता.
हे ही वाचा >>Crime: तरुणाने विवाहित महिलेचा जबडाच फाडला, प्रेमसंबंध अन्...
आरोपी आणि नंदकिशोर यादव यांच्यात वाद सुरू झाल्यानंतर नंदकिशोरने त्यांना निघून जाण्यास सांगितलं तेव्हा एका आरोपीनं खुर्ची उचलली आणि मारून फेकली. दरम्यान, त्याचा मित्र विक्रम गुरुस्वामी रेड्डी यानं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण एका आरोपीने गोळीबार केला आणि तो थेट रेड्डी यांनाच गोळी लागली.
दरम्यान, या घटनेनंतर चांगलाच गोंधळ उडाला. त्यानंतर रेड्डी यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. देहू रोड पोलीस ठाण्यात एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, आरोपींची ओळख पटली असून त्यांना अटक करण्यासाठी छापे टाकले जात आहेत. ही घटना वैयक्तिक वैमनस्यातून घडली की, घटनास्थळी घडलेला वादच कारणीभूत होता, हे शोधण्यासाठी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.