Pune Crime News : कंपनीच्या पार्किंगमध्ये 28 वर्षीय तरूणीची कोयत्याने सपासप वार करत हत्या, कंपनीत सोबतच करत होते काम
शुभदा कोदरे असं पीडितेचे नाव असून, आरोपी कृष्णा कनोजा आणि ती फर्मच्या अकाउंट्स विभागात सोबत काम करत होते. पोलिस आयुक्त मनोज पाटील म्हणाले, 'प्राथमिक माहितीनुसार, संशयिताने कोदारे यांच्यावर कंपनीच्या पार्किंगमध्ये संध्याकाळी सहाच्या सुमारास तरूणीवर धारदार शस्त्राने वार केले.'
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कंपनीतील सहकाऱ्याने महिलेला संपवलं

पार्किंगमध्येच केले कोयत्याने सपासप वार

उधारीचा वाद असल्याचा प्राथमिक अंदाज
पुण्यातील एका बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (बीपीओ) कंपनीत काम करणाऱ्या 28 वर्षीय तरूणीवर तिच्या सहकाऱ्याने मंगळवारी संध्याकाळी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्या महिलेचा मृत्यू झाला. शहरातील येरवडा भागात असलेल्या WNS या कंपनीच्या पार्किंगमध्ये हा हल्ला झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
शुभदा कोदरे असं मृत्यू झालेल्या तरूणीचं नाव असून, आरोपी कृष्णा कनोजा आणि ती कंपनीच्या अकाउंट्स विभागात सोबत काम करत होते. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील म्हणाले, 'प्राथमिक माहितीनुसार, संशयिताने कोदारे यांच्यावर कंपनीच्या पार्किंगमध्ये संध्याकाळी सहाच्या सुमारास तरूणीवर धारदार शस्त्राने वार केले. उधार पैसे देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती मिळाली.
हे ही वाचा >> Ramgiri Maharaj Statement : 'जन गण मन'ला विरोध, "वंदे मातरम हे खरं राष्ट्रगीत"; रामगिरी महाराजांच्या वक्तव्यानं वाद होणार?
तरूणीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यानं तिला तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तरूणीचा मृत्यू झाला. आरोपी कनोजाला ताब्यात घेण्यात आलं असून, मृत तरूणीच्या बहिणीच्या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता (BNS) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा >> Walmik Karad: 'लाकडं पाठवून द्यावी, तसंही कराड सुटल्यावर...', कराडवरून संजय राऊतांचा करडा सवाल
दरम्यान, गेल्या काही दिवसात घडलेल्या काही घटनांमुळे पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येचाही बदला गेण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे. यापूर्वी पोर्शे कार अपघात, सतीश वाघ हत्या प्रकरण आणि आता त्यानंतर घडलेल्या या घटनेमुळे गुन्हेगारीच्या घटनांची मालिका कायम सुरू असल्याचं दिसतंय.