Recruitment: भरपूर पगाराची सरकारी नोकरी; भारतीय तटरक्षक दलात सुवर्णसंधी!

रोहिणी ठोंबरे

ICG Recruitment 2024 : भारतीय तटरक्षक दलात (Indian Coast Guard) नाविक (GD) 01/2025 बॅच आणि यांत्रिक (GD) 01/2025 बॅच अशा दोन पदांसाठी करिअरची चांगली संघी आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय तटरक्षक दलात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे.

point

320 जागांसाठी भारतीय तटरक्षक दलात ही भरती होत आहे

Indian Coast Guard Recruitment 2024 : भारतीय तटरक्षक दलात (Indian Coast Guard) नाविक (GD) 01/2025 बॅच या पदासाठी 260 जागा तर, यांत्रिक (GD) 01/2025 बॅच या पदासाठी 60 जागा अशा एकूण 320 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 03 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (Recruitment 2024 High paying government job in Indian Coast Guard Apply today)

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारे उमेदवार, 

  • नाविक (GD) 01/2025-  12वी उत्तीर्ण (Maths & Physics)

  • यांत्रिक (GD) 01/2025 बॅच- 10वी उत्तीर्ण + 03-04 वर्षीय इंजिनीअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) किंवा 10वी किंवा 12वी उत्तीर्ण + 02-03 वर्षीय इंजिनीअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) असणे आवश्यक आहे.
  • हेही वाचा : पुण्यातील PNG ज्वेलर्सच्या कॅलिफोर्नियातील शोरुमवर दरोडा! पाहा CCTV व्हिडीओ

    वयोमर्यादा

    या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 मार्च 2003 ते 28 फेब्रुवारी 2007 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

    हेही वाचा : Vidhan Sabha Election 2024: वडेट्टीवारांसाठी गुड न्यूज, पुन्हा होणार आमदार?

     

    शुल्क

    या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 300 रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/एसटी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

    अधिक माहितीसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट https://indiancoastguard.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

    हेही वाचा : राणे थेट म्हणाले, 'कोकणातून मी शिवसेना संपवली..' नेमकं कोणाला डिवचलं?

    नोकरीची लिंक

    https://cgept.cdac.in/icgreg/candidate/login

    हे वाचलं का?

      follow whatsapp