Saif Ali Khan Property : मुंबईत बंगला, हरियाणामध्ये अलिशान हवेली... सैफ अली खानची संपत्ती नेमकी किती?
रात्री 2 वाजता घरात घुसलेल्या चोरट्याने सैफ अली खानवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याच्या शरीरावर 2-3 वेळा हल्ले झाले आहेत. एवढ्या मोठ्या अभिनेत्याच्या घरात चोर घुसतो कसा असा प्रश्न उपस्थित होत असताना, सैफची प्रॉपर्टी किती असाही सवाल अनेकांना पडला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला

रात्री 2 वाजता घरास घुसून चोराचा हल्ला

सैफ अली खानची प्रॉपर्टी नेमकी किती?
Saif Ali Khan Attack : मुंबईमध्ये राहणाऱ्या सैफ अली खानवर चोराकडून चाकूने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. सैफच्या घरात चोर घुसल्यानंतर त्याचा नोकराशी वाद झाला, त्यानंतर सैफ उठला आणि थेट चोराशी झटापट केली. रात्री 2 वाजता घरात घुसलेल्या चोरट्याने सैफ अली खानवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याच्या शरीरावर 2-3 वेळा हल्ले झाले आहेत. सध्या हा अभिनेता मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहे. हा हल्ला कोणी आणि का केला याचा शोध पोलीस घेत आहेत.
नवाब घराण्यातील सैफ अली खानची कौटुंबिक पार्श्वभूमी आधीच खूप तगडी असून, सैफने 1993 मध्ये 'परंपरा' चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 30 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 'मैं खिलाडी तू अनाडी, आरजू, कच्चे धागे, सलाम नमस्ते, हम तुम, लव्ह आज कल, ओमकारा, गो गोवा गॉन, कल हो ना हो, परिणीता, रेस, अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'टशन आणि तान्हाजी' या माध्यमातून तो सर्वांचे मन जिंकतो.
सैफ तब्बल 5 हजार कोटींचा मालक
हे ही वाचा >>Saif Ali Khan Attack : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून चाकूने हल्ला, नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, जर आपण सैफ अली खानच्या एकूण संपत्तीवर नजर टाकली तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याची एकूण संपत्ती सुमारे 150 दशलक्ष डॉलर्स एवढी आहे. भारतीय चलनात सुमारे 120 कोटीपर्यंत हा आकडा जातो. तर दरवर्षी 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई तो करतो.
सैफच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत म्हणजे त्याचे चित्रपट, वेब सिरीज, ब्रँड एंडोर्समेंट आणि वैयक्तिक गुंतवणूक. अनेक अहवालांमध्ये असंही म्हटलं जातं की पटौदी घराण्याचा 10 वा नवाब सैफ अली खान यांची एकूण संपत्ती सुमारे 5000 कोटी रुपयांपर्यंत आहे. तर सैफकडे इल्युमिनाटी फिल्म्स आणि ब्लॅक नाईट फिल्म्स या दोन प्रॉडक्शन हाऊस आहेत.
हे ही वाचा >>मोठी कारवाई सुरू, फडणवीसांनी फास आवळला.. आरोपींचा बाजार उठणार?
सैफ अली खानचे कार कलेक्शन
इंडस्ट्रीतील एक यशस्वी अभिनेता म्हणून, सैफ अली खानकडे हरियाणातील मध्ये पटौदी पॅलेस आणि मुंबईमध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. हा अभिनेता त्याच्या कुटुंबासह मुंबईतील वांद्रेमध्ये एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतो. याशिवाय, त्याच्याकडे कोट्यवधी रुपयांच्या आलिशान गाड्यांचं कलेक्शन आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफकडे मर्सिडीज बेंझ S350, ऑडी R8 स्पायडर, रेंज रोव्हर स्पोर्ट्स, BMW 730LD, जीप ग्रँड चेरोकी आणि फोर्ड मस्टँग GT500 सारख्या आलिशान आणि मौल्यवान कार आहेत.