Saif Ali Khan House CCTV Video : हल्ला होण्यापूर्वी 2 तास कुणी आत आलंच नाही? पोलिसांना काय आढळलं?
सैफ अली खानवर घरात घुसून रात्री 2 वाजला हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. चोर घरात घुसल्यानंतर त्याची नोकरांशी झटापट सुरू होती. यावेळी सैफ तिथे पोहोचला आणि त्यानं स्वत: चोराशी दोन हात केले. यावेळी तो गंभीर जखमी झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सैफ अली खानवर मध्यरात्री 2 वाजता हल्ला

तपासासाठी पोलिसांचं पथक घरी पोहोचलं

पोलिसांना CCTV व्हिडीओमध्ये काय सापडलं?
पटौदी घराण्याचा नवाब आणि बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल रात्री सैफ अली खानच्या घरात घुसून एका चोराने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला आहे. रात्री 2 वाजता एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरात घुसला. हल्ल्यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अभिनेत्यावर शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, याप्रकरणी सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सैफ आली खानवरील हल्ल्याबाबत मुंबई पोलिसांचं निवेदन समोर आलं आहे. तसंच, सैफच्या PR टीमचं अधिकृत निवेदनही प्रसिद्ध करण्यात आलं आहे. अभिनेत्यावरील हल्ल्याच्या प्रकरणात आतापर्यंत कोणते खुलासे झाले आहेत ते जाणून घेऊया.
हे ही वाचा >> Saif Ali Khan Property : मुंबईत बंगला, हरियाणामध्ये अलिशान हवेली... सैफ अली खानची संपत्ती नेमकी किती?
मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, काल रात्री एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरात घुसला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या मोलकरणीशी झटापट झाली. त्या दोघांमधील झटापट पाहून, सैफ धावून गेला. यावेळी त्याने सैफवर चाकूने वार केले. दोघांमध्ये जोरदार झटापट झाली.
सैफ अली खानचा फ्लॅट हा 12 व्या मजल्यावर आहे. त्यामुळे एवढ्या वर चोर गेला कसा हा प्रश्न कायम आहे. तसंच हा व्यक्ति घरात येईपर्यंत इतर लोक किंवा सुरक्षा रक्षक असतील, तर ते काय करत होते. कारण, याप्रकरणातली सर्वात मोठी अपडेट अशी समोर आली आहे की, सैफच्या घरात कुणीही जाताना दिसलं नव्हतं. त्यामुळे हल्ला करणारा हा आधीच आत आला होता? अशीही शक्यता आहे.
हे ही वाचा >> Saif Ali Khan Stabbed : सैफवर चाकूचे 6 वार, घरातले इतर सदस्य कुठे होते? टीमने काय म्हटलं? करिश्माच्या स्टोरीवर..
सैफ-करीनाच्या टीमने काय म्हटलं?
"सैफच्या पीआर टीमने जारी केलेल्या निवेदनानुसार, सैफच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला होता. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. आम्ही माध्यमांना आणि चाहत्यांना संयम राखण्याचे आवाहन करतोय. ही पोलीस केस आहे. आम्ही तुम्हाला परिस्थितीबद्दल अपडेट देत राहू."