MNS Vs Ajit Pawar : "अजित पवारांनी स्वत:च्या जीवावर लढावं आणि मग बोलावं, भाजपचा पदर धरून..."
अजित पवार यांना एवढ्या जागा मिळाल्या, यावर राज ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. त्यानंतर अजित पवार यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला होता. अजित पवार यांच्या वक्तव्याला मनसेतून सडेतोड उत्तर मिळाल्यामुळे हा वाद वाढण्याची चिन्ह आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अजित पवार यांच्या वक्तव्यावर मनसेचं प्रत्युत्तर

अजित पवार यांनी आधी स्वत:च्या जीवावर लढावं

EVM बद्दल काय म्हणाले अमित ठाकरे?
Raj Thackeray Vs Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या निकालाची चर्चा राज्याच्या राजकारणात अजूनही सुरू आहे. विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांसोबतच अनेक राजकीय नेतेही या निकालावर आश्चर्य व्यक्त करताना दिसले आहे. नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या एका मेळाव्यात राज ठाकरे यांनी विधानसभेच्या निकालावर आश्चर्च व्यक्त केलं होतं. अजित पवार यांना एवढ्या जागा मिळाल्या असंही राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर अजित पवार यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला होता. अजित पवार यांच्या वक्तव्याला मनसेतून सडेतोड उत्तर मिळाल्यामुळे हा वाद वाढण्याची चिन्ह आहेत.
हे ही वाचा >> Delhi Chief Minister : दिल्लीत भाजपला बहुमत, पण मुख्यमंत्रिपदासाठी कुणाचं नाव? धक्कातंत्र की महाराष्ट्राचाच फॉर्म्युला??
राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, त्यांच्या वक्तव्याशी आम्हाला काय घेणंदेणं? आम्हाला लोकांनी निवडून दिलं. आम्हाला जनतेने निवडून दिलं. लोकसभेला महायुतीला 17 जागा मिळाल्या, तेव्हा आम्ही रडत बसलो नव्हतो. तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता आलं नाही आणि तुम्ही गप्पा मारता. मलाही मुलाला, पत्नीला निवडून आलं नव्हतं. जनतेने जो कौल दिला तो मान्य केला पाहिजे असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर आता अमित ठाकरे आणि मनसे नेत्यांकडून उत्तर आलं आहे.
"भाजपचा पदर धरल्यामुळे अजित पवारांना..."
अजित पवार यांनी दिलेल्या उत्तराला आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. संदीप देशपांडे म्हणाले, त्यांचाही मुलगा, पत्नी निवडून आले नव्हते. अजित पवार यांनी भाजपशी लग्नगाठ बांधल्यामुळे त्यांना मत मिळालं. भाजपचा पदर धरल्यामुळे आम्हाला मतदान नाही, तर राज ठाकरे यांच्या नावावर मतं पडली आहे. अजित पवार यांनी स्वत:च्या जीवावर उभं राहावं आणि मग या सगळ्या वल्गना कराव्यात.
अजित पवारांच्या वक्तव्यावर अमित ठाकरे काय म्हणाले?
हे ही वाचा >> 'या' 12 जागांमुळे आपचा गेम झाला, काँग्रेसमुळे पराभव अन् भाजपला...
अजित पवार यांच्या वक्तव्यावर अमित ठाकरे म्हणाले, मी लहान आहे. त्यांना राजसाहेबच उत्तर देतील. पण मी या निवडणुकीत भरपूर शिकलो आहे. माझ्या पहिल्या निवडणुकीवरुन नाही, तर शेवटच्या निवडणुकीवरुन माझ्याबद्दलचं मत तयार करा. पुढे बोलताना अमित ठाकरे म्हणाले, EVM आलं म्हणजे प्रोग्रामिंग आलं 2017 मध्ये राज ठाकरे ममता बॅनर्जी यांच्यासह सगळ्या मोठ्या नेत्यांना भेटले होते आणि म्हणाले होते की EVM वर विश्वास नसेल तर त्यावर बहिष्कार टाका. अमित ठाकरे म्हणाले, निवडणुका बॅलट पेपरवर घेतल्या जाव्यात ही आमची जुनी मागणी आहे.