अ‍ॅम्बेसीच्या लेडीज टॉयलेटमध्ये गुप्त कॅमेरा, 60 व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

crime news in marathi : 

ADVERTISEMENT

देशात अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या दुसऱ्या देशाच्या दूतावासातच एका व्यक्तीने अत्यंत घृणास्पद कृत्य केलं आहे. या व्यक्तीने गुप्तपणे दूतावासाच्या टॉयलेटमध्ये स्पाय कॅमेरा बसवला होता. यात त्याने थंड डोक्याने 60 व्हिडिओ रेकॉर्ड केले. या प्रकरणी बँकॉकच्या साऊथ क्रिमिनल कोर्टाने या व्यक्तीला 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. (By installing a secret camera in the embassy’s ladies toilet, a man silently made 60 videos of women.)

थायगरच्या रिपोर्टनुसार, थायलंडची राजधानी बँकॉकमधील ऑस्ट्रेलियन दूतावासातून ही बाब समोर आली. संबंधित व्यक्तीचं नाव नयोत बँक थमसोंगसाना (39) असं आहे. तो थायलंडमधील ऑस्ट्रेलियन दूतावासात आयटी कर्मचारी म्हणून काम करत होता. या प्रकरणाशी संबंधित तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की, न्योतने अत्यंत थंड डोक्याने 60 महिलांचे व्हिडिओ बनवले. प्रकरण समोर आल्यानंतर पीडित महिलांनी रॉयल थाई पोलिसांसमोर जबाब दिले. यातील 2 महिलांनी आरोपीविरुद्ध तक्रार दिली, त्यानंतर न्योतविरुद्ध न्यायालयात सुनावणी झाली.

हे वाचलं का?

WhatsApp वर एक मेसेज अन् मुलगी दारात हजर… ठाण्यात सेक्स रॅकेट उद्ध्वस्त

या प्रकरणी न्यायाधीशांनी नयोतला पहिली 4 वर्षांची शिक्षा सुनावली. पण, नंतर त्याची शिक्षा २ वर्षांपर्यंत कमी करण्यात आली. हा निकाल देताना न्यायमूर्तींनी नयोतला फटकारलं. न्यायमूर्ती म्हणाले की, नयोत हा समाजासाठी एक मोठा धोका आहे, त्याने अनेकांना भावनिकरित्या दुखावण्याचं काम केलं आहे. याप्रकरणी ऑस्ट्रेलियन दूतावासाने सादर केलेल्या अहवालात नयोतचा यापूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचे समोर आले आहे. नयोतला रॉयल थाई पोलिसांनी जानेवारी 2022 मध्ये अटक केली होती. यानंतर आयटी सिस्टम मॅनेजरच्या नोकरीवरून त्याला काढून टाकण्यात आलं होतं.

आईचा राग मनात धरला अन् 14 वर्षांच्या मुलाने मृत्यूला कवटाळलं…

निकाल येताच नयोता रडू लागला :

यावेळी न्यायाधीशांनी नयोतला 2 वर्षांची शिक्षा सुनावली. याशिवाय तक्रार नोंदविलेल्या दोन्ही महिलांना 70-70 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशही दिले. ही शिक्षा सुनताच नयोत रडू लागला. शिक्षा सुनावताना न्यायालयात उपस्थित नयोतच्या पत्नीने त्याचं सांत्वन केलं. मात्र आता या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी नयोतला एक महिन्याचा कालावधी मिळणार आहे. हा निकाल देताना ऑस्ट्रेलियन दूतावासाचे तीन अधिकारीही कोर्टात हजर होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT