Sharad Pawar on RSS : शरद पवार यांनी खरंच RSS चं कौतुक केलं? का होतेय चर्चा?
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याबद्दलच्या चर्चांनी जोर धरला आहे. शरद पवार यांच्या खासदारांच्या संदर्भानेही वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शरद पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधताना काय म्हणाले?

शरद पवार यांनी खरंच RSS चं कौतुक केलं?

शरद पवार यांच्या वक्तव्याची का होतेय चर्चा?
Sharad Pawar on RSS : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि स्वयंसेवकांचं कौतुक केलंं आणि एकच चर्चा सुरू झाली. शरद पवार म्हणाले की, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या महाविजयाचं श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जातं. निवडणूक विजयात संघाचं काम आणि त्यांच्या स्वयंसेवकांच्या कठोर परिश्रमाचा मोठा वाटा आहे. मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत बोलताना शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष कसा नव्यानं उभा राहिला याची आठवण करुन देत 1962 आणि 1977 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांची आठवण करुन दिली.
"लोकसभा निवडणुकीनंतर आपण बेफिकीर झालो"
हे ही वाचा >>Santosh Deshmukh Murder Case: आरोपी विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी! केज कोर्टात नेमकं काय घडलं?
शरद पवार यांच्या मते लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर राष्ट्रवादी पूर्णपणे बेफिकीर झाली, तर सत्ताधारी पक्ष (महायुती) निवडणुका जिंकण्यासाठी सतत काम करत राहिले आणि अनेक लोकप्रिय योजना जाहीर केल्या. महायुतीमध्ये असलेल्या पक्षांनी या काळात मोठे निर्णय घेतले आणि निवडणुकीत जोरदार मेहनत घेतली. शरद पवार पुढे असंही म्हणाले की, निवडणुकीत आरएसएसने खूप सतर्कतेनं काम केलं आणि भाजपला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
'आरएसएसकडे समर्पित स्वयंसेवक'
शरद पवार म्हणाले, संघाकडे समर्पित स्वयंसेवक आहेत. त्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या मार्गापासून विचलित होत नाहीत. यावेळी पवारांनी आरएसएसच्या कार्याचंही कौतुक केलं. ते पुढे म्हणाले, निवडणुकीपूर्वी इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) 17 नवीन महामंडळांची निर्मिती करणं भाजपसाठी महत्वाची ठरलं आणि त्यांना पाठिंबा मिळविण्यातही मदत झाली.
हे ही वाचा >> Santosh Deshmukh Case : "तपासाबद्दल काहीच माहिती नाही...", संतोष देशमुखांच्या लेकीचा यंत्रणांना सवाल
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याबद्दलच्या चर्चांनी जोर धरला आहे. शरद पवार यांच्या खासदारांच्या संदर्भानेही वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या काळातील घडामोडींकडे राज्याचं लक्ष आहे. अशातच शरद पवार यांनी संघाच्या कामाचं कौतुक केल्यानं अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जातंय.