Shinde यांचा CM होण्याचा मार्ग कसा झालेला मोकळा?, ‘ही’ आहे जूनमधली क्रोनोलॉजी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra Political Crisis June 2022 Chronology: मुंबई: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता (Maharashtra Political Crisis) अंतिम टप्प्यात आली आहे. कारण आता प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) कधीही निर्णय देऊ शकतं. यासाठी कोर्टात प्रदीर्घ अशी सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूने प्रचंड जोरदार असे युक्तिवाद केले गेले. या सगळ्या युक्तिवादात विधानसभा अध्यक्ष, आमदार अपात्रतेचा मुद्दा आणि राज्यपालांची भूमिका या सगळ्याबाबत वेगवेगळे युक्तिवाद झाले. पण या सगळ्या गोष्टींना नेमकी कशी आणि कधी सुरुवात झाली.. ठाकरे कसे गेले आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रिपदी (CM Post) कसे आले या सगळ्याची क्रोनोलॉजीच (Chronology) आपण आपण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया. (thackeray paved the way for eknath shinde to become chief minister understand chronology in june 2022)

ADVERTISEMENT

शिंदे मुख्यमंत्री पदी कसे आले?, क्रोनोलॉजी समजून घ्या!

  • 21 जून 2022: एकीकडे विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला असताना दुसरीकडे शिवसेनेचे साधारण 30 आमदार हे अचानक नॉट रिचेबल झाले. ज्यानंतर हे सगळे आमदार सूरतला गेले असल्याचं समोर आलं.

  • 22 जून 2022: मात्र, सूरत हे महाराष्ट्रापासून अगदीच जवळ असल्याने. आपल्यासोबत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी एकनाथ शिंदेंनी आपल्या सगळ्या बंडखोर आमदारांना सूरतवरून थेट आसाममधील गुवाहटीत हलवलं.

  • हे वाचलं का?

  • 23 जून 2022: एकीकडे शिवसेनेत फूट पडली असली तरीही महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र आपण शिवसेनेच्या पाठिशी कायम असल्याचं स्पष्ट केलं.

  • Thackeray Vs Shinde: सरन्यायाधीशांचा सवाल; साळवेंचं उत्तर, डाव पलटणार?

    ADVERTISEMENT

    • 24 जून 2022: यानंतर बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. यावेळी शिवसेनेने 16 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवा अशी मागणी केली.

    ADVERTISEMENT

  • 25 जून 2022: शिवसेनेच्या मागणीनंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली.

  • 26 जून 2022: विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बंडखोर आमदारांना जी नोटीस पाठवली त्याविरोधात शिंदे गटाने तात्काळ सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले.

  • 26 जून 2022: यावेळी सुप्रीम कोर्टाने 16 बंडखोर आमदारांना दिलासा दिला. कोर्टाने 12 जुलैपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश विधानसभा उपाध्यक्षांना दिले.

  • Maharashtra Political Crisis: ठाकरेंना चूक भोवणार? साळवेंनी फिरवला डाव! Live

    • 28 जून 2022: दुसरीकडे भाजपने असा दावा केला की, ठाकरेंकडे बहुमत नाही. त्यांचं सरकार कोसळलं आहे. त्यामुळे त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे बहुमत चाचणीची मागणी केली.

    • 29 जून 2022: भाजपच्या मागणीनंतर कोश्यारींनी ठाकरे सरकारला त्यांचे बहुमत विधानसभेत सिद्ध करण्याचे आदेश दिले.

    • 29 जून 2022: तत्कालीन राज्यपालांच्या याच आदेशानंतर उद्धव ठाकरेंनी त्याच दिवशी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

    • 30 जून 2022: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताच दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला आणि त्यानंतर त्यांनी भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

    अशा पद्धतीने राज्यातील राजकारणात जून 2022 मध्ये घडामोडी घडल्या होत्या. याच सगळ्या घडामोडी आता खूपच महत्त्वाच्या ठरत आहेत. कारण याच गोष्टींभोवती सुप्रीम कोर्टात वेगवेगळ्या प्रकारचे युक्तिवाद सुरू आहेत.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT