Solapur Truck Accident : आईसोबत ट्यूशनला निघालेल्या चिमुकलीला ट्रकने चिरडलं, सोलापुरात संताप
साक्षी कलबुर्गी तिच्या आईसोबत ट्यूशनला जात होती. शुक्रवारी संध्याकाळी, साक्षीची आई दोन मुलांसह दुचाकी स्कूटीवरुन ट्यूशनला जात होती, तेव्हा एका टिप्परने स्कूटीला धडक दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आईसोबत ट्यूशनला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू

टिप्परच्या धडकेत चाकाखाली सापडली चिमुकली

आई आणि मुलगा वाचले, मुलगी जागीच दगावली
Solapur Truck Accident : सोलापुरातील गुरूनानक चौकात शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. या अपघातात एका सहा वर्षांच्या मुलीचा तिच्या आईसोबत ट्यूशनला जाताना मृत्यू झाला. टिप्परने धडक दिल्यानं झालेला हा अपघात एवढा भीषण होता की, सहा वर्षांच्या साक्षी कलबुर्गीचा (वय 6 वर्षे, रा. कुर्बान हुसेन नगर, सोलापूर) जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. संतप्त जमावानं टिप्पर जागीच थांबवला आणि टिप्पर चालकाला मारहाण केली.
हे ही वाचा >>धक्कादायक... वाल्मिकने खंडणी मागितलेल्या अवादा कंपनीतील कामगाराचा मृत्यू, रस्त्यावरच सापडला मृतदेह
साक्षी कलबुर्गी तिच्या आईसोबत ट्यूशनला जात होती. शुक्रवारी संध्याकाळी, साक्षीची आई दोन मुलांसह दुचाकी स्कूटीवरुन ट्यूशनला जात होती, तेव्हा एका टिप्परने अॅक्टिव्हाला धडक दिली. या धडकेत साक्षीची आई एका मुलासह रस्त्याच्या कडेला पडली आणि साक्षी कलबुर्गी टिप्परखाली आली . चिरडल्या गेल्यानं सहा वर्षांच्या साक्षी कलबुर्गीचा मृत्यू झाला.
साक्षी कलबुर्गीचे वडील मुन्ना कलबुर्गी हे सोलापूर शहरातील कामगार नेते आहेत. माजी आमदार नरसैया आदम यांच्या चळवळीत ते नेहमीच सक्रीय असतात. साक्षीची आजी नलिनी कलबुर्गी माजी नगरसेवक आहेत. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी गर्दी जमली. नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तातडीने अधिक पोलिसांना पाचारण करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
हे ही वाचा >>Satara Crime News : शेतात आढळला धड नसलेला मृतदेह, साताऱ्यात खळबळ, काळ्या जादूचं प्रकरण?''
साक्षीला उपचारासाठी सोलापूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.