Santosh Deshmukh Case : केज, नांदेड ते पुण्यातील बालेवाडी... सुदर्शन घुले, सुधीर सांगळे कसे सापडले? डॉ. वायबसेंचा रोल काय?

मुंबई तक

Sudarshan Ghule Arrested : डॉ. वायबसे यांना ताब्यात घेतल्यांवर प्रकरणाचा गुंता सुटला? केज तालुक्यातील हत्या प्रकरणाची ही लिंक व्हाया नादंडे, पुण्यापर्यंत कशी गेली हे जाणून घेणं महत्वाचं असणार आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नांदेडमध्ये नेमकं काय कनेक्शन?

point

सुदर्शन घुले, सुधीर सांगळे कुठे सापडले?

point

हत्या झाल्यापासून डॉ. वायबसे का गायब होते?


बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार असलेल्या सुधीर सांगळ आणि सुदर्शन घुले यांना पोलिसांनी अटक केली. ते पुण्यातील बालेवाडीमध्ये सापडले आहेत. त्यामुळे केज तालुक्यातील हत्या प्रकरणाची ही लिंक व्हाया नादंडे, पुण्यापर्यंत कशी गेली हे जाणून घेणं महत्वाचं असणार आहे. ही संपूर्ण स्टोरी सविस्तर जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत वाचा.

वाल्मिक कराड सापडला, पण सुदर्श घुले आणि सुधीर सांगळे सापडत नव्हते. या सर्व लोकांच्या संपर्कात असलेल्या वेगवेगळ्या लोकांची पोलिसांकडून चौकशी होत होती. पण या सर्व आरोपींना ओळखणारे केजमधील डॉक्टर वायबसे हे 9 तारखेपासून सापडत नव्हते. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. पोलिसांनी त्यांना शोधायला सुरूवात केली. नातेवाईकांच्या मृत्यूच्या अंत्यविधीलाही तो आला नाही, म्हणून पोलिसांचा संशय बळावला. 

बीड, नांदेड ते पुणे...

डॉक्टर असणाऱ्या वायबसेंचे राजकीय कनेक्शन असून, त्यांचे इतर व्यवसायही आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असता, ते आणि त्यांच्या पत्नी पोलिसांना नांदेडमध्ये सापडले. वायबसेंना तिथून ताब्यात घेतलं. एसआयटी चे प्रमुख डॉक्टर बसवराज तेलींनी डॉक्टर संभाजी वायबसेंची अडीच तास चौकशी केली.  चौकशी अंती सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पुण्याच्या दिशेनं रवाना करण्यात आलं.

पुण्यात कुठे लपले होते आरोपी?

हे ही वाचा >> Sudarshan Ghule Arrested : संतोष देशमुख प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला SIT कडून अटक

पुण्यात गेलेल्या पथकाच्या सतत बीड पोलीस संपर्कात होते. पोलिसांना पक्की माहिती मिळाल्यानंतर सापळा रचत पुण्याच्या बालेवाडी भागात एका रूममध्ये सुदर्शन घुले आणि सुदर्शन सांगळे यांना पोलिसांना पकडलं. गुप्त माहितीदाराच्या माध्यमातून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना 4 जानेवारी पहाटेच्या दरम्यान पोलिसांनी या आरोपींच्या मुस्क्या आवळल्या. संपूर्ण घटनाक्रम जवळपास 12 तास चालला.

दरम्यान, या आरोपींना 12 वाजता केज न्यायालयात हजर करण्यात आलं असून, त्याला किती दिवसाची पोलीस कोठडी होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तसंच वायबसेंवर काही कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं आहे. कारण, डॉ. वायबसे हे अजूनही या प्रकरणातील आरोपी नाहीत अशी माहिती आहे. त्यामुळे आता पोलीस त्यांच्याबद्दल काय सांगतात हे पाहणं महत्वाचं आहे.



 

हे वाचलं का?

    follow whatsapp