Suresh Dhas : सुरेश धस-धनंजय मुंडे यांची भेट, साडेचार तास चर्चा? बावनकुळे आणि धस काय म्हणाले?
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सुरू झालेल्या लढ्यानंतर राज्यभर वातावरण पेटलं. सुरेश धस यांनी हा मुद्दा लावून धरण्याचं काम केलं होतं. यादरम्यान, त्यांनी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अनेक गंभीर आरोप केले होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली

भेट लपवण्यामागे नेमकं काय कारण?

बावनकुळे यांनी नेमकं काय सांगितलं?
Suresh Dhas Dhananjay Munde : "संतोष देशमुखांचा लढा आणि तब्बेतीची चौकशी या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहे. भरणे मामांनी रात्री उशिरा त्यांना दवाखान्यात नेलं होतं, त्यामुळे मी चौकशी केली. मी धनंजय मुंडे यांना परवा त्यांच्या निवासस्थानी भेटलो" असं सुरेश धस म्हणाले. दुसरी कुठलीही चर्चा आमच्यात झाली नसल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं. तसंच धनंजय मुंडे यांचा राजीनामा मी अजून मागितलेला नाही, त्यांच्याच पक्षाचे लोक राजीनामा मागत होते. राजीनामा घेणं, न घेणं त्यांच्या नेत्यांचा विषय आहे, तसंच आमचा लढा आरोपी फासावर जाईपर्यंत सुरू राहणार असल्याचं म्हटलं आहे.
बावनकुळे म्हणाले, चार-साडेचार तास सोबत होतो...
हे ही वाचा >> Palghar : काका आणि भावानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भपातही केला आणि...
"धनंजय मुंडे, सुरेश धस आणि आम्ही चार-साडेचार तास होतो. धनंजय मुंडे-सुरेश धस या दोघांमध्येही मतभेद आह, मनभेद नाही. दोघंही फार इमोशनल आहेत. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, आमचे जुने संबंध आहे. सुरेश धस, धनंजय मुंडेंची पारिवारिक भेट झाली असं बावनकुळे म्हणाले.
सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ सुरू झाली आहे. या भेटीमागे खरंच प्रकृतीची चौकशी करण्याचं कारण होतं की इतर राजकीय चर्चा झाल्या असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सुरेश धस यांनी वेगवेगळ्या मोर्चांमध्ये जोरदार भाषणं करत आपली आक्रमक भूमिका मांडली होती. मात्र, आता या भेटीनंतर सुरेश धस यांच्या भूमिकेवरही संशय घेतला जातोय.
हे ही वाचा >> Pune Crime : वाढदिवस साजरा करताना झाला वाद, रागात गोळीबार केला, एकाचा अंत झाला
मनोज जरांगे यांनीही या भेटीवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. ही माहिती मिळताच आम्हाला धक्का बसला, अजूनही यावर विश्वास बसत नाही. एखाद्या राजकारण्यावर लोक विश्वास ठेवत नाही, पण टाकला होता. मात्र, आता यांनाच सगळ्यांना मिळवून संतोष देशमुख यांचं प्रकरण पचवायचं दिसतंय असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. मात्र, या सर्व प्रकरणाला मी दबू देणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले.