Suresh Dhas : अजित पवार यांच्यासमोर सुरेश धसांनी DPDC बैठकीत थेट करूणा मुंडेंचं नाव घेतल?
पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज बीडमध्ये पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. मागच्या काही दिवसांपासून बीडमध्ये सुरू असलेल्या घटनांनंतर सुरेश धस, धनंजय मुंडे, यांच्यासारख्या कट्टर विरोधकांच्या आमने-सामने येण्यामुळे वादळी ठरणार म्हणून राज्याचं लक्ष या बैठकीकडे लागून होतं.
ADVERTISEMENT

बीडमध्ये आज अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक पार पडली. अजित पवार हे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर आले होते. मागच्या काळात संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर बीडमध्ये झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बीडचं पालकमंत्रिपद हे धनंजय मुंडेंना न देता ते अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. त्यामुळे आजच्या बैठकीत काय काय घडामोडी घडणार यावर राज्याचं लक्ष होतं. सुरेश धस यांनी या बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल माध्यमांना सांगितलं.
हे ही वाचा >>Raj Thackeray Mumbai : "निवडून आलेल्यांनाच स्वत:वर विश्वास बसेना...", विधानसभेवरुन महायुतीवर निशाणा?
सुरेश धस यांनी आजच्या या बैठकीत बोगस कामांच्या बिलांचा मुद्दा उपस्थित केला. अजित पवार यांनी आम्हाला लेखी पत्र द्यायला सांगितलं. 73 कोटी रुपये बोगस उचलल्याचं मी रात्री जाहीर केलं. मी त्याची लेखी तक्रार आता देणार आहे असं धस म्हणाले. तसंच याबद्दल स्वतंत्र चौकशी समिती नेमून चौकशी होईल असं धस म्हणाले. बिंदू नामावलीच्या मुद्द्यावर मी आजही कायम आहे, मी बैठकीत त्यावर बोललो. अजित पवार यांच्या कानावर ते गेलंय. करूणा मुंडेंच्या गाडीत पिस्तूल ठेवतात,साड्या घालतात, 15 जेसीबी,ट्रक हे असं असणाऱ्या पोलिसांबद्दलचाही मुद्दा उपस्थित केल्याचं धस म्हणाले.
हे ही वाचा >>Ajit Pawar Beed : कमरेला कट्टे लावून फिरणाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम, बाजूला मुंडे उभे असताना म्हणाले...
बैठकीत बाचाबाची झाल्याचं नाकारलं तरी सुरेश धस म्हणाले की, किरकोळ विषय आहे, चर्चा आणि बोलताना एवढं तेवढं होत असतं. त्यामुळे त्यात एवढं काही विशेष नाही. तसंच धनंजय मुंडे यांच्याबद्दलचे पुरावे आम्ही अजित पवार यांचे स्वीयसहाय्यक यांच्याकडे दिले आहेत.