Suresh Dhas : जातीवाद नाही, हा 4-5 टक्के लोकांचा गुंडाडवाद... परळीतील राड्यावर काय म्हणाले सुरेश धस?
वाल्मिकवर मकोका लावण्यात आल्यानंतर परळीमध्ये वाल्मिकच्या समर्थकांनी बंद पुकारला. ऐन संक्रांतीच्या दिवशी बाजारपेठ बंद करायला लावली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

"वाल्मिक कराड यांच्या आईबद्दल मी बोलणार नाही"

परळीतील राड्यानंतर काय म्हणाले सुरेश धस?

धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्या कुटुंबाला भेटले?
वाल्मिक कराड प्रकरणावर बोलताना सुरेश धस यांनी आज पुन्हा एकदा मुन्नीचा उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं. तसंच या प्रकरणातील इतर लोकही सापडतील असं ते म्हटले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरेश धस हे प्रकरण लावून धरलं होतं. आता वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला असून, यानंतर सुरेश धस यांचा फोकस कशावर असेल असा प्रश्न माध्यमांनी केला असता सुरेश धस यांनी याप्रकरणाचा तपास होईपर्यंत लक्ष देणार असल्याचं म्हटलं. तसंच परळीत सुरू असलेल्या गोंधळावरही त्यांनी टीका केली.
हे ही वाचा >>'वाल्मिक कराडने खुनाच्या दिवशी देशमुखांना दिलेली धमकी..' कोर्टात प्रचंड खळबळजनक दावा
वाल्मिकवर मकोका लावण्यात आल्यानंतर परळीमध्ये वाल्मिकच्या समर्थकांनी बंद पुकारला. ऐन संक्रांतीच्या दिवशी बाजारपेठ बंद करायला लावली. यावर बोलताना सुरेश धस म्हणाले, परळी बंद करणं शक्य आहे का? परळीचा हा सुद्धा पॅटर्न महाराष्ट्राने बघावा. आरोपीला कलमात ताब्यात घेतलं की, शहरं दुकानं बंद करायची आरडाओरडा करायचा हा नवा परळी पॅटर्न. मकर संक्रांतीचा बाजार बंद केला त्यांनी. अशा दबावाला कोण विचारतं? अशी खोचक टीका धस यांनी केली.
सुरेश धस पुढे बोलताना म्हणाले, परळीत सुरू असलेला हा जातीवाद नाही, हा गुंडाडवाद आहे. यांना मानणाऱ्या चार-पाच टक्के लोकांचा गुंडाडवाद आहे असं म्हणत धस यांनी टीका केलं. पुढे बोलताना ते म्हणाले, कर्तव्यदक्ष एसपी बीडमध्ये आहेत. त्यांनी काय काय कारवाई केली ते विचारणार.
हे ही वाचा >>'वाल्मिक कराडने खुनाच्या दिवशी देशमुखांना दिलेली धमकी..' कोर्टात प्रचंड खळबळजनक दावा
धनंजय मुंडे वाल्मिकच्या कुटुंबाला भेटले असल्याची चर्चा सध्या बीडमध्ये सुरू आहे. त्यावर धस म्हणाले, वाल्मिक कराडच्या मातोश्रींना, कुटुंबाला भेटणं त्यांचं कामंच आहे. ते आता 302 मध्ये गेलेत तर त्यांना भेटायचं कामंच आहे. वाल्मिक कराड यांच्या मातोश्रीवर मी बोलणार नाही. राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा असं धस म्हणाले. आका सापडला, त्याच्यापुढे कडी सापडते का? कारवाई नीट होते का? यावर आमचं लक्ष असणार आहे असं सुरेश धस म्हणाले आहेत.