Thane Crime News : आरोपीला पळवून नेण्यासाठी 19 वर्षाचा मित्र थेट कोर्टात? पोलिसांनी कसा पकडला?
पोलिसांकडून मिळवलेल्या माहितीनुसार, आरोपी गुप्ताने पोलिसांशी गैरवर्तन केलं आणि त्यांना थेट ढकललं. यावेळी झटापट आणि गोंधळादरम्यान त्याने आरोपीला पोलिसांच्या ताब्यातून सोडण्याचा प्रयत्नही केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अल्पवयीन आरोपीच्या मित्राचा पोलिसांवर हल्ला

आरोपीला कोर्टात सादर केलं असताना कोर्टातच घडला प्रकार

इशारे करत असताना पोलिसांनी आरोपीला पकडलं
ठाणे जिल्ह्यातील एका न्यायालयात एका 19 वर्षीय तरुणानं त्याच्या अंडरट्रायल मित्राला पोलीस कोठडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यानं पोलिसांवरही हल्ला केला. मंगळवारी दुपारी कल्याण कोर्टाच्या कोर्टरूममध्ये आरोपी सुजीत गुप्ताने नागेश दंडेला हातवारे करून बोलण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांनी त्याला तिथून निघून जाण्यास सांगितलं.
हे ही वाचा >> Nitesh Rane : बोर्डाच्या परीक्षा केंद्रांमध्ये बुरखा घालण्यास परवानगी देऊ नका, शिक्षण मंत्र्यांना पत्र
पोलिसांकडून मिळवलेल्या माहितीनुसार, आरोपी गुप्ताने पोलिसांशी गैरवर्तन केलं आणि त्यांना थेट ढकललं. यावेळी झटापट झाली. गोंधळादरम्यान, त्याने आरोपी दंडे याला पोलिसांच्या ताब्यातून सोडण्याचा प्रयत्नही केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी गुप्ताला ताब्यात घेतलं.
पोलिसांनी आरोपीविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम 132 (सरकारी सेवकाला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी हल्ला किंवा बळजबरी करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा >> बुलढाणा: महिलेच्या गर्भातील बाळाच्या पोटात दुसरं बाळ... हे घडलं तरी कसं?
सध्या, पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज स्कॅन करत आहेत. पूर्ण घटनेचा क्रम जाणून घेण्यासाठी प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवत आहेत. या प्रकरणाची माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तपास सुरू आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.