Vasant More : वसंत मोरेंना थेट मातोश्रीवरुन फोन, स्वारगेटवर तोडफोड केल्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
वसंत मोरे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी स्वारगेट स्थानकावर तोडफोड केल्याचं दिसलं. वसंत मोरे आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी स्थानकावर लावलेल्या इतर बसेसमधूनही अत्यंत घाणेरडं चित्र समोर आलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वसंत मोरे यांना उद्धव ठाकरेंचा फोन

चांगलं केलंत... उद्धव ठाकरेंकडून कौतुक

वसंत मोरे म्हणाले, साहेब तिथे एसटीमध्ये लॉजिंग केलं
स्वारगेट परिसरात काल पहाटे झालेल्या घटनेनं महाराष्ट्र हादरला. त्यानंतर आता समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांमधून संताप व्यक्त होताना दिसतोय. काल झालेल्या घटनेनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून संताप व्यक्त होताना दिसला. वसंत मोरे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी स्वारगेट स्थानकावर तोडफोड केल्याचं दिसलं. वसंत मोरे आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी स्थानकावर लावलेल्या इतर बसेसमधूनही अत्यंत घाणेरडं चित्र समोर आलं.
हे ही वाचा >> Pune : स्वारगेट केसमधील आरोपी फरार? पोलिसांकडून एक लाखाचं बक्षीस, राष्ट्रीय महिला आयोगनं घेतली दखल
वसंत मोरे यांच्या नेतृत्वात झालेल्या या निदर्शनांच्या नंतर उद्धव ठाकरे यांनीही दखल घेतल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना फोन करुन त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करत आंदोलकांचं कौतुक केलं. "जय महाराष्ट्र वसंत, चांगलं केलंत, जोरात केलंत, बोलण्याच्या पलीकडे परिस्थिती आहे. जे आपण लढतोय, कारण आपला जीव जळतोय, महाराष्ट्र कुठे चाललाय, यो लोकांना पोलिसांची भीती नाही. चांगलं केलंत तुम्ही, सगळ्यांना धन्यवाद द्या..." असं उद्धव ठाकरे म्हणाले. वसंत मोरे उद्धव ठाकरेंना म्हणाले, "साहेब खूप घाणेरडा प्रकार होता, एसटीमध्ये लॉजिंग केलं होतं, जाणारी लोकं सुरक्षा कर्मचाऱ्यांसमोरूनच जातात."
हे ही वाचा >> Solapur : प्रेयसीच्या पतीला मारण्याचा कट रचला, पण दारूच्या नशेत दोघंही तलावात बुडाले...
वसंत मोरे यांनी स्वत: ही माहिती आणि ऑडिओ शेअर केला. "कोण म्हणते "मातोश्रीवर" कामाची दखल घेतली जात नाही. आंदोलनानंतर अगदी काही तासातच पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊतसाहेब दोघांचीही पाठीवर थाप. आंदोलनात सहभागी सर्व शिवसैनिकांचे महिला रणरागिणींचे अभिनंदन केले आणि जिथे अन्याय दिसेल आणि विशेष महिला भगिनीवर अन्याय होईल तिथे असेच पेटून उठा असा आशीर्वाद, धन्यवाद साहेब..." अशी पोस्ट वसंत मोरे यांनी केली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी टोरेस स्कॅम सारखा मोठा घोटाळा समोर आला आहे. भरगोस परतावा मिळवण्याच्या नादात लोक आयुष्यभराची जमापुंजी अशा योजनांमध्ये गुंतवतात आणि पदरी निराशा पडते. त्यामुळे अशा आकर्षक परतावा देणाऱ्या योजनांपासून सावध राहण्याचं आवाहन पोलीस वारंवार करत असतात.