Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, फडणवीसांची माहिती
देशमुख कुटुंबाच्या वेगवेगळ्या मागण्यांपैकी एक असलेली मागणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता मस्साजोगमध्ये सुरू असलेलं आंदोलन कधीपर्यंत सुरू ठेवणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

संतोष देशमुख प्रकरणी सरकारचा मोठा निर्णय

उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: दिली माहिती
Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
हे ही वाचा >> Thane Ulhasnagar : उल्हासनगर पोलीस ठाणेत गोळीबार प्रकरणात ट्विस्ट, भाजप नेत्याच्या मुलाला क्लिन चीट, प्रकरण काय?
संतोष देशमुख यांची हत्या होऊन अडीच महिना उलटला. मात्र, अजूनही या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधले हा फरार आहे. तर दुसरीकडे इतर आरोपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मुजोरी, आरोपी आणि पोलिसांचे संबंध, पोलिसांकडून केली जाणारी टाळाटाळ, या मुद्द्यांमुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल का अशी शंका उपस्थित केली जातेय. याच सर्व प्रश्नांना धरून मस्साजोगकर आणि संतोष देशमुख यांचं कुटुंब कालपासून अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी कालपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं. तसंच या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी अशी मागणी देशमुख कुटुंबने केली होती.
देशमुख कुटुंबाच्या वेगवेगळ्या मागण्यांपैकी एक असलेली मागणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता मस्साजोगमध्ये सुरू असलेलं आंदोलन कधीपर्यंत सुरू ठेवणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तसंच अन्नत्याग आंदोलन करताना करण्यात आलेल्या इतर मागण्यांबद्दल चर्चा करण्यासाठी धनंजय देशमुख यांच्याशी कुणी संपर्क साधणार का हे पाहणं महत्वाचं असेल.
हे ही वाचा >> Pune : "शरीरसुखाची मागणी पूर्ण न केल्यानं मला निलंबित केलं...", PCMC महिला कंडक्टरचा कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न
उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीमुळे फायदा होईल, लवकरच चार्च शीट फाईल होणार आहे, त्यातही त्यांचा सल्ला महत्वाचा ठरेल अशी भावना संतोष देशमुख यांनी व्यक्त केली आहे.