Walmik Karad : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे सुनावणी
वाल्मिक कराडची कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार होतं. मात्र, व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातूनच ही सुनावणी घेण्यात आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वाल्मिक कराडला 14 दिवसांची कोठडी

पोलीस कोठडी संपल्यानंतर वाल्मिक न्यायालयीन कोठडीत
Walmik Karad Beed : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख प्रकरण आणि आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडची कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार होतं. मात्र, व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातूनच ही सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा >> Kirit Somaiya : "अकोल्यात 15 हजार बांगलादेशींना जन्माचे दाखले देण्याचा घोटाळा", सोमय्यांचा दावा नेमका काय?
मकोकामध्ये वाल्मिक कराडला याआधी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती. आज ती पोलीस कोठडी संपली होती. आरोपीचे वकील अशोक कवडे कोर्टात हजर होते. तर सरकारकडून सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे कोर्टामध्ये हजर होते. तपास अधिकारी किरण पाटील यांनी तपासाची माहिती दिली. या प्रकरणात तपास पूर्ण झाल्याची पाटलांनी दिली माहिती. पोलीस कोठडीची गरज नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार 5 फेब्रुवारीपर्यंत आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या कराड बीड पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये आहे.
बीड जिल्हा कारागृहात कराडची रवानगी होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा >> Devendra Fadnavis : पहिल्याच दिवशी 6 लाख कोटीच्या गुंतवणुकीचे करार, CM फडणवीसांच्या नेतृत्वात नवा विक्रम
दरम्यान, आवादा कंपनीला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली, त्यावशीच म्हणजेच 29 नोव्हेंबरला हे सर्व आरोपी सोबतच असल्याचं सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यानं या प्रकरणात कोर्ट काय निर्णय देणार यावर सर्वांचं लक्ष होतं. वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून दोन कोटी रुपयांची खंडणी आवादा पवनचक्की प्रोजेक्टच्या सुनिल शिंदे यांना मागितली होती. याच कार्यालयामध्ये बसून ती मागितली होती असा आरोप आहे. खंडणी मागण्या अगोदर आरोपींची बैठक झाली. यामध्ये आरोपी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, सुधीर सांगळे हे आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्या सोबत दिसतोय. या सीसीटीव्हीनंतर न्यायालयात याबद्दल काही युक्तिवाद होणार का आणि पोलीस कोठडी मिळणार का यावर सर्वांचं लक्ष होतं.