Crime News : आधी पत्नी आणि मुलाल संपवलं, मग आई-वडिलांवर हल्ला केला आणि नंतर... हादरवणारी घटना
34 वर्षांच्या आरोपीनं पत्नी आणि मुलांचा भोसकून खून केला. तसंच आपल्या जन्मदात्या आई-वडिलांवरही हल्ला करून त्यांनाही संपवण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेनं खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पोटच्या मुलावर सपासप वार....

पत्नीलाही संपवलं, आई वडिलांवरही हल्ला

नराधमाचा स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न
रागाच्या भरात एका व्यक्तीनं पत्नी आणि 4 वर्षाच्या निष्पाप मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर त्यानं वृद्ध आई-वडिलांवरही चाकूने हल्ला केला. तसंच त्यानंतर स्वत:चा गळा कापून आत्महत्येचाही प्रयत्न केला. तिघांचे जीव घेणारा नराधम मात्र वाचला. या रक्तरंजित घटनेचा घटनाक्रम ऐकून पोलीसही हादरले. गुजरातमधील सुरत शहरात घडलेल्या या घटनेचा सध्या पोलीस तपास करत आहेत.
34 वर्षांच्या स्मित जिवानी नावाच्या आरोपीनं पत्नी आणि मुलांचा भोसकून खून केला. तसंच आपल्या जन्मदात्या आई-वडिलांवरही हल्ला करून त्यांनाही संपवण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) विपुल पटेल यांनी सांगितलं की, प्राथमिक तपासानुसार, आरोपीने आपल्या मामाच्या कुटुंबाने आपल्या कुटुंबाशी संबंध तोडल्याच्या रागातून हे केल्याचा संशय आहे.
हे ही वाचा >> 'आमचा परळी पॅटर्न, इथे रश्मिका आणि प्राजक्ता माळीही येतात...', सुरेश धसांचं बोचरं विधान
डीएसपी पटेल यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार आरोपी स्मित जिवानी यांनी शुक्रवारी सकाळी सुरत शहरातील सरथाना भागात त्यांच्या घरी पत्नी हिरल (३०), मुलगा चाहत (४), आई विलासबेन आणि वडील लाभूभाई यांच्यावर चाकूने हल्ला केला. या घटनेनंतर आरोपीनं स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, या हल्ल्यात आरोपीची पत्नी हिरल आणि मुलगा चाहत यांचा मृत्यू झाला, तर जिवानी आणि आई-वडील जखमी झाले. या तिघांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेबद्दल बोलताना सांगितलं की, तपासादरम्यान जिवानी हा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्यामुळे त्याच्या मामाच्या कुटुंबीयांनी त्याच्याशी व त्याच्या कुटुंबीयांशी संबंध तोडून त्यांना त्यांच्या घरी येण्यास मनाई केली होती. याच घटनेनंतर हा प्रकार घडल्याची शक्यता आहे.
हे ही वाचा >> Dharashiv Sarpanch Attack : मस्साजोगसारखाच हल्ला धाराशिवमध्ये... सरपंचाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, स्वत: सांगितली आपबीती
पोलीस उपअधीक्षक विपुल पटेल पुढे म्हणाले की, या रक्तरंजित घटनेमागील नेमकं कारण शोधण्यासाठी कसून तपास करण्यात येत आहे. पोलिसांचं पथक या प्रकरणाच्या प्रत्येक बाजूने तपास करत आहे. सध्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.