Nagpur : ऑनलाईन गेम खेळताना झालं 40 हजार कर्ज, जिथं काम करत होता तिथंच तरूणानं केली चोरी, कसा सापडला?
अटक केलेल्या आरोपीचं भरत असं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानं 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान दुकानातून 5 लाख 96 हजार रुपये चोरले. पकडले जाऊ नये म्हणून, त्याने दुकानाच्या छताची तोडफोड करुन ठेवली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ऑनलाईन गेम खेळताना झालं 40 हजाराचं कर्ज

कर्ज फेडण्यासाठी तरूणानं केली चोरी

दरोडा वाटावा म्हणून छताचे पत्रही तोडले
Nagpur Crime News : नागपूरमध्ये एका कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला 6 लाख रुपये चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अटक केलेला आरोपी गेल्या नऊ वर्षांपासून त्याच दुकानात काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ऑनलाइन रमी खेळताना 40,000 रुपयांचं कर्ज केलं होतं.ते कर्ज फेडण्यासाठी ही चोरी केली होती.
अटक केलेल्या आरोपीचं भरत असं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानं 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान दुकानातून 5 लाख 96 हजार रुपये चोरले. पकडले जाऊ नये म्हणून, त्याने दुकानाच्या टिनच्या छताचं नुकसान करून बाहेरून चोरी झाल्यासारखं दाखवण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा >> Beed : वाल्मिकच्या समर्थकांनी ज्याला बेदम मारलं तो बीड पोलिसांचा 'होमगार्ड', धक्कादायक माहिती समोर
छतावर कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीच्या पावलांचे ठसे किंवा बोटांचे ठसे आढळले नाहीत. तेव्हा पोलिसांना प्रथम संशय आला. या चोरीत बाहेरच्या कुणाचाही सहभाग नसल्याचं तपासात समोर आलं. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. यानंतर पोलिसांनी दुकानातील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आणि त्यांना भरत हेडाऊवर संशय आला. चौकशीदरम्यान हेडाऊने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी बुधवारी त्याला अटक केली आणि त्याच्याकडून 5 लाख 93 हजार रुपये जप्त केले. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपीने कर्ज फेडण्यासाठी हे पाऊल उचललं होते, पण त्याचा प्लॅन फसला.
हे ही वाचा >>Sangli : चिमुकलीवर बलात्कार केला, हत्या करून मृतदेह लपवला, आरोपीने कुटुंबासमोर मुलीला शोधण्याचं नाटकही केलं
दरम्यान, पोलिसांनी आरोपीविरुद्ध चोरी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तसंच या घटनेमुळे ऑनलाइन जुगारामुळे कशा समस्या तयार होऊ शकतात यांचं उदाहरण म्हणून सुद्धा चर्चेत आहे.