Crime: नवऱ्याच्या हत्येनंतर बायकोची ग्रॅंड पार्टी, अन्…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Wife Orgnize grand Party after husband death
Wife Orgnize grand Party after husband death
social share
google news

Wife Orgnize grand Party after husband death : ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं अथवा घर, कारसारख्या मोठ्या गोष्टी खरेदी केल्या की लोक नेहमीच पार्टी देतात. मात्र या घटनेत उलटचं घडलंय. एका महिलेने नवऱ्याच्या हत्येनंतर थेट ग्रॅंड पार्टी (grand party) दिल्याची घटना घडलीय. ही घटना वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असेलच. विशेष म्हणजे या पार्टीनंतर महिलेला पतीच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी (Police) अटक केली होती. त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे? आणि बायकोने (Wife) पतीची हत्या कशी केली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Wife allegedly murdered husband organize grand party after his death)

ADVERTISEMENT

घटनाक्रम काय?

अमेरीकेच्या उटाह परिसरात राहणाऱ्या कॉरी रिचिन्स या महिलेच्या नवऱ्याच्या हत्या झाली होती. या हत्येच्या दुसऱ्याचा दिवशी महिलेने घरातच ग्रॅंड पार्टीचे (grand party) आयोजन केले होते. या पार्टीत तिने मित्रपरिवार आणि नातेवाईकांना बोलावले होते. या पार्टीत दारू आणि डिजेही ठेवण्यात आला होता. महिलेने या पार्टीत दारू पिऊन मोठं सेलिब्रेशन केलं. पतीची हत्येच्या एका दिवसापुर्वीच महिलेने ठेवलेल्या पार्टीवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

हे ही वाचा : बायको दिरासोबत नाचली, अन् भर मंडपात पतीने दोन्ही भावांना मारून टाकलं!

बायकोलाच पोलिसांकडून अटक

कॉरी रिचिन्सच्या पतीचा (Husband Death) मृत्यू 4 मार्च 2022 रोजी झाला होता. पतीला विष दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांच्या हाती अनेक पुरावे लागले होते.त्यामुळे पोलिसांनी कॉरी रिचिन्सला ताब्यात घेतले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पोलिसांचं म्हणण काय?

कॉरी रिचिन्सने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पतीला मिक्स वोडका ड्रिंक दिली होती. ही ड्रिंक्स पिऊन तो बेशुद्ध झाला होता. पतीला वाचवण्याच्या खुप प्रयत्न केला मात्र त्याचे निधन झाल्याची माहिती कॉरीने दिली. महिलेच्या पतीचा मृत्यू फेंटानिल ड्रग्सच्या ओवरडोजमुळे झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आले होते. हे ड्रग्स त्याच्या शरीरात क्षमतेपेक्षा जास्त सापडले होते. तसेच पतीच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशीने तिने बिझनेस पार्टी केल्याचीही कबूली दिली होती.

हे ही वाचा : बायकोशी फोनवर बोलण्यावरुन दोन भावांवर चाकू हल्ला, एकाचा जागीच मृत्यू

तसेच कोर्टात दाखल केलेल्या कागद पत्रात देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॉरी रिचिन्सने तिच्या ओळखीच्या मित्राकडून औषध मागवून घेतले होते. हे औषध ती दररोज पतीच्या जेवणात मिसळून द्यायची. या औषधामुळेच तिच्या पतीच्या शरीरात ड्रग्जचे प्रमाण वाढत होते. यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. तपासात ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी कॉरी रिचिन्सला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT