Nishikant Dubey : ’70 हजार कोटी घोटाळ्यात केस पृथ्वीराज चव्हाणांनी केली’

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

NO Confidence Motion : दिल्ली सेवा विधेयकावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे भाजपला लक्ष्य केले. नॅशनल कॅरप्ट पार्टीच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेला आज (8 ऑगस्ट) भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे बोट दाखवत उत्तर दिले.

ADVERTISEMENT

मणिपूर हिंसाचार मुद्द्यावरून काँग्रेसने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या चर्चेत बोलताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी म्हणणं मांडलं. यावेळी त्यांनी विरोधकांच्या आघाडीवर टीका करताना सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिले.

निशिकांत दुबे सुप्रिया सुळेंना काय म्हणाले?

अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत बोलताना खासदार दुबे म्हणाले, “त्या दिवशी सुप्रिया सुळे खूप बोलत होत्या. एनसीपीला (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) नॅचरली करप्ट पार्टी म्हटलं. असं म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. भाजपाही म्हणते. आम्ही लोक म्हणत असतो. त्यामुळे मी याच्या मुळाशी गेलो. 1980 मध्ये शरद पवार यांच्या निवडून आलेलं सरकार कुणी बरखास्त केलं? आम्ही नाही केलं. काँग्रेसने केलं”, असा इतिहास दुबेंनी सांगितला.

हे वाचलं का?

वाचा >> No Confidence Motion : नंबर गेम, ‘इंडिया’ची स्ट्रॅटजी, तुमच्या 10 प्रश्नांची उत्तरे

“शरद पवारांनी वेगळी एनसीपी बनवली होती. आम्ही त्यांना पक्ष बनवायला नव्हतं सांगितलं. मी पहिल्यांदा निवडून आलो, तेव्हा दररोज महागाईची चर्चा व्हायची. दररोज शरद पवारांवर आरोप व्हायचे. ते आम्ही नाही केले. आणि शेवटी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ माणसाला ग्राहक तक्रार व्यवहार खाते सोडावं लागलं”, असं म्हणत दुबेंनी काँग्रेसवर टीका केली.

भुजबळांवर गुन्हा पृथ्वीराज चव्हाणांनी दाखल केला -दुबे

“मी कागदपत्रं बघत होतो. 2012-13 मध्ये 70 हजार कोटींचा घोटाळा. आता श्वेतपत्रिका याच काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढली. छगन भुजबळांवर महाराष्ट सदन घोटाळ्यात केस पृथ्वीराज चव्हाणांनीच दाखल केली. त्यांच्याच एसीबीने केली. 70 हजार कोटींच्या जलसिंचन घोटाळ्याची केस काँग्रेसनेच केली. आम्ही काय केलं तुमच्यासोबत? आमच्यासोबत कसली लढाई?”, असा सवाल निशिकांत दुबेंनी सुप्रिया सुळेंना केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT