‘राजीनामा परत घेण्यासाठीचं आंदोलन पवारांच्याच आदेशावरून’, अजित पवारांचा खळबळजनक खुलासा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ajit pawar big revelation about sharad pawar resignation yb center karjat ncp crisis
ajit pawar big revelation about sharad pawar resignation yb center karjat ncp crisis
social share
google news

Ajit Pawar Big revelation About Sharad Pawar Resign : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कर्जतमध्ये सुरु असलेले शिबीर आज संपन्न झाले आहे. या शिबिराच्या समारोपाच्या भाषणात अजित पवार यांनी शरद पवार गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. यावेळी शरद पवार (Sharad pawar) यांनी वाय. बी. सेंटरमध्ये राजीनामा दिला होता. हा राजीनामा मागे घेण्यासाठी नंतर त्यांनीच कार्यकर्त्यांना आंदोलन करण्यास भाग पाडल्याचा आरोप अजित पवार (Ajit pawar) यांनी केला आहे. (ajit pawar big revelation about sharad pawar resignation yb center karjat ncp crisis)

ADVERTISEMENT

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय शिबिरात शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर पडद्यामागे घडसेल्या सर्व घडामोडी सांगितल्या आहेत.2 मेला कुणालाच काही माहित नाही. घरातल्या फक्त चौघांनाच माहिती होते, ते राजीनामा देणार होते.तशा पद्धतीने राजीनामा दिला आणि 15 जणांची कमिटी जाहीर केली. या कमिटीने बसाव आणि अध्यक्ष निवडावा असा त्यांनी प्रस्ताव ठेवल्याचे अजित पवारांनी सांगितले.

हे ही वाचा : Rule Change : 1 डिसेंबरपासून ‘हे’ नियम बदलले, सर्वसामान्यांच्या खिशावर काय होणार परिणाम ?

शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या सर्व घडामोडीनंतर ते घरी गेले. त्यावेळी अनेकांनी वेगवेगळी प्रतिक्रिया दिली. मित्रांनो इकडे आनंद परांजपे बसला आहे. राजीनामा दिल्याचे सर्वत्र मिडियात आल्यानंतर जितेंद्र आव्हाडला बोलून घेतले गेले. उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठाणला काही लोक महिला, युवक पाहिजे आणि त्यांनी तिकडे आंदोलन केले पाहिजे, असे सांगितले गेले.

अरे आम्हाला सांगा ना…राजीनामा परत घ्या, परत घ्या, मला काही कळलं नाही हे काय चाललय? जर द्यायचाच नव्हता मग का दिलाच का? त्यानंतर मग हे रोज आंदोलन करायचे आणि ती ठरावीक टाळकी होती, एकही मंत्री नव्हता जितेंद्र आव्हाडला सोडून, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा : Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, सुर्या-राहुलच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

अजित पवार यांनी रोहित पवार यांच्यावर देखील टीका केली. कोण तरी अधून मधून बोलत असतात, त्याला उत्तर द्यायंच नाही. काही काही जण गुडघ्याला बाशिंगबांधुन कुठ कुठं फिरायला लागलेत. कुठं काय करायला लागलेत…कुठ काय संघर्ष? अरे कशाचा संघर्ष, कधी आयुष्यात संघर्ष केला नाही, मग आता कशाचा संघर्ष,असा टोलाच अजित पवारांना रोहित पवारांना लगावला आहे.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT