राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, मनसेची मान्यता रद्द करा! 'खळखट्याक'वरुन थेट सुप्रीम कोर्टात याचिका
Raj Thackeray: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांवर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यानंतर आता थेट सुप्रीम कोर्टात राज ठाकरेंविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज ठाकरे आणि मनसेविरोधात याचिका

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

"निवडणूक आयोगाने मनसेची मान्यता रद्द करावी"
Raj Thackeray : राज्यात हिंदी भाषिक लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याने राज ठाकरे आणि मनसैनिकांच्या द्वेषपूर्ण भाषणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची आणि निवडणूक आयोगाकडून मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा >> Fact Check: मुंब्य्राचा 'तो' Video अन् राज ठाकरेंना विचारतायेत जाब.. काय आहे हे सगळं प्रकरण?
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि नेते राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे हिंदी भाषिकांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी
सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत याचिकाकर्त्याने द्वेषपूर्ण भाषणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. तसंच निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची मान्यता रद्द करावी अशी मागणीही केली आहे. ही याचिका उत्तर भारतीय विकास सेनाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी दाखल केली आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रातील उत्तर प्रदेश-बिहारमधील हिंदी भाषिकांवर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी-रामविलासचे खासदार राजेश वर्मा यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला होता.
हे ही वाचा >> सकाळी उठल्यावर काय पाहणं असतं शुभ? येईल पैसाच पैसा...
राजेश वर्मा यांनी आरोप केला की, राज ठाकरेंचे मनसैनिक महाराष्ट्रात उदरनिर्वाहासाठी गेलेल्या उत्तर प्रदेश-बिहारमधील हिंदी भाषिक लोकांना मारहाण करतायत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली आहे.