Ajit Pawar : ‘…म्हणून पहाटे 5 वाजताच काम सुरू करतो’,अजितदादांनी सांगितलं कारण

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ajit pawar tell reason working earli morning pm narendra modi sharad pawar baramati
ajit pawar tell reason working earli morning pm narendra modi sharad pawar baramati
social share
google news

महाराष्ट्राच्या राजकारणात अजित दादा एकमेव असे नेते आहेत, जे रोज पहाटेच उठून उद्धाटन सोहळ्याला हजेरी लावतात. अनेक ठिकाणांना भेट देतात. अशा त्याच्या या कामाच्या पद्धतीबाबत अजितदादांनी खुलेपणाने भाष्य केले आहे. तुम्ही एवढा बोजा खांद्यावर टाकलाय की पहाटे 5 वाजताच बावचळून उठून कामाला लागतो. बायको म्हणते जरा वयाचा विचार करा, पण यातून वेगळं समाधान मिळतं असल्याचे अजितदादांनी बारामतीकरांना सांगितले.(ajit pawar tell reason working earli morning pm narendra modi sharad pawar baramati)

ADVERTISEMENT

तुम्ही सगळे पाहताय, करोडो रूपयांची कामे चालली आहेत. हे तुमच्या भरभक्कम पाठिंब्यामुळे करू शकलो आहे. तुम्ही एवढा बोजा खांद्यावर टाकता. विधानसभा निवडणूकीत 1 लाख 68 हजार मताधिक्य दिलंत आणि समोरच्यांचे डिपॉझिट जप्त केलंत, आता अस केल्यावर मी काय करायचं.म्हणून पहाटे 5 वाजताच बावचळून उठून कामाला लागतो. बायको म्हणते जरा वयाचा विचार करा, पण यातून वेगळं समाधान मिळतं असल्याचे अजित दादांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा : Sonia Akhtar News : बांगलादेशी महिलेसोबत सौरभचा फ्रेंच किस, सोनियाचा तो व्हिडिओ व्हायरल…

आता उद्या पावणे सहाला कुठंतरी साईटवर असेन, त्यावेळी तुम्ही मस्तपैकी चांगल्या झोपेत असाल…यामुळे बारामतीकरांना त्रास होत नाही, मी जर 10 वाजता साईटवर गेलो, तर तुम्ही इतकी गर्दी करता की मला काम पाहताच येत नाही, त्यामुळे तुम्ही पांघरूनात असताना बघून टाकायचं, मग सूचना देता येतात,असे देखील अजित पवार यांनी सांगत आपल्या पहाटेच्या कामाला सुरु करण्याची माहिती दिली.

सत्तेत सामील होण्याची भूमिका केली स्पष्ट

1991 पासून बारामतीकरांनी मला एवढं प्रेम दिलंय. माझ्यावर कुटुंबाप्रमाणे प्रेम केल्याचे अजित पवार यांनी सुरूवातीला सांगितले. मी अनेक सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घेतल्या आणि त्यांच्या कामकाजावर टिका केली. पण त्यावेळी लक्षात आले नाही, पुढे इतके चांगले काम होणार आहे,असे अजित पवार यांनी सांगितले. काही कटू निर्णय घ्यावे लागतात. पण हे निर्णय बारामतीच्या विकासासाठी घेतले. त्यामुळे आज बारामती डोळ्यासमोर ठेवा. बारामती फलटण रस्त्याचं काम मंजूर झालं आहे. हे 700 कोटी रूपयांच काम असून चार पदरी रस्ता हेणार आहे, अशी माहिती देत अजित पवार यांनी आता राज्यभर सभा घ्याव्या लागणार आहेत. मी भूमिका घेतलीय ती मला महाराष्ट्राला सांगायची आहे, असे देखील अजित दादांनी सांगितले.

हे ही वाचा : Chandrayaan-3: प्रज्ञान रोव्हरचा चंद्रावर ‘मूनवॉक’, ISRO कडून नवीन व्हिडिओ जारी

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT