भाजप प्रवेशाची चर्चा…बावनकुळेंसोबतच्या भेटीनंतर आशिष देशमुख काय म्हणाले?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आशिष देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. आशिष देशमुख आता पुन्हा भाजप मध्ये जाणार का? अशी शक्यता निर्माण झालीय.या चर्चेवर आता आशिष देशमुख काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
Ashish Deshmukh Join BJP : योगेश पांडे, नागपूर : कॉग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर कॉंग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांना पक्षाने नोटीस बजावली होती.या नोटीशीनंतर आशिष देखमुख यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आशिष देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. आशिष देशमुख आता पुन्हा भाजप मध्ये जाणार का? अशी शक्यता निर्माण झालीय.या चर्चेवर आता आशिष देशमुख काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात. (bjp chandrashekhar bawankule and congress ashish deshmukh meet speculation of bjp entry)
ADVERTISEMENT
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याशी माझे संबंध खुप जुने आहेत. नागपूर जिल्ह्यात राजकारण करत असताना, आम्ही दोघेही आमदार होतो, ते मंत्रीही होते, पालकमंत्री होते. त्या अनुषंगाने अतिशय जिव्हाळ्याचे घरोब्याचे संबंध आहेत,असे देशमुख (Ashish Deshmukh) म्हणाले आहेत. तसेच नाश्त्याच्या निमित्ताने त्यांनी मला निमंत्रण दिले होते. त्या नाश्त्याचा आस्वाद घेण्यासाठी मी इथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा : ‘तीन महिन्यात चौकशी करा’,’दोषी आढळलो तर….’,गुलाबराव पाटलांच राऊतांना आव्हान
भाजप प्रवेशावर देशमुख (Ashish Deshmukh) म्हणाले की, नक्कीच नाही, मी कॉंग्रेसमध्येच आहे. कॉग्रेस पक्षातून मी काही कालावधीसाठी निलंबित जरी झालो असलो तरी, मी जे शोकॉस नोटीसला उत्तर दिलेय, तेव्हाही म्हटले होते, माझी हकालपट्टी पक्ष करणार नाही आणि नक्कीच मला पक्षातून काढणार नसतील तर इतर कुठे जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी य़ावेळी स्पष्ट केले. तसेच कॉग्रेस माझ्यावर कारवाई करू शकत नाही. आणि त्या अनुषंगाने मी कॉंग्रेसमध्ये माझी पुढचील वाटचाल चालू ठेवेन, असे देखील ते म्हणाले.
हे वाचलं का?
माझ्यावर निलंबनाची कारवाई झालीय, मात्र पक्षातून बाहेर करण्याची कारवाई मागच्या 10 ते 15 दिवसात झालेली नाही. मला तेव्हाही खात्री होती, मात्र उत्तर वाचल्यानंतर कॉंग्रेसचे मुंबईचे पक्षश्रेष्ठी असोत किंवा दिल्लीचे असोत पक्षातून बाहेर काढण्याची कारवाई करणार नाही,असे देखील देशमुख (Ashish Deshmukh) यांनी सांगितले होते.
हे ही वाचा : ‘बाळासाहेबांचे विचार पायदळी…’,PM मोदीच्या एकेरी उल्लेखानंतर CM शिंदे ठाकरेंवर बरसले!
आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिन्याला एक खोका घेतात असा गंभीर आरोप केला होता. याशिवाय मी माफी मांगायला राहुल गांधी नाही,असे वक्तव्य केले होते.या वक्तव्यानंतर त्यांना पक्षाने नोटीस बजावली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT