Sanjay Raut: ‘गजाभाऊ सांगतायेत BJP आम्हाला लाथा घालतायेत, आता एक-एक कोंबडी..’, राऊत संतापले!

मुंबई तक

ADVERTISEMENT

bjp is a python or a crocodile sanjay raut criticizes bjp after gajanan kirtikars statement
bjp is a python or a crocodile sanjay raut criticizes bjp after gajanan kirtikars statement
social share
google news

Sanjay Raut Shiv Sena: मुंबई: शिंदे गटाने (Shinde Group) खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी काल (26 मे) असं विधान केलं की, भाजप (BJP) शिवसेनेला (शिंदे गट) सापत्न वागणूक देत आहे. त्यांच्या याच विधानवर शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बरंच तोंडसुख घेतलं. यावेळी संजय राऊत म्हणाले की, गजानन कीर्तिकरांसारखा नुकताच शिंदे गटात (Shinde Group) गेलेला नेता भाजप सापत्न वागणूक देत असल्याचं म्हणत असेल तर याचा अर्थ भाजपने खुराड्यात पाळलेल्या कोंबड्या आता एक-एक करून कापल्या जाणार. पाहा संजय राऊत पत्रकार परिषदेत नेमकं काय-काय म्हणाले. (bjp is a python or a crocodile sanjay raut criticizes bjp after gajanan kirtikars statement)

ADVERTISEMENT

‘भाजप हा अजगर किंवा मगर आहे…’

‘गजाभाऊ कीर्तिकर हे आम्ही एकत्र असताना आमचे फार जवळचे सहकारी होते. त्यांनी सुद्धा अशाप्रकारे सोडून जाणं हे आमच्यासाठी वेदनादायी होतं. पण आज जे गजाभाऊ बोलतायेत की, त्यांच्या गटाबरोबर.. मी त्यांना पक्ष मानत नाही.. त्यांच्या गटाबरोबर सापत्न म्हणजे सावत्रपणाची वागणूक देतायेत किंवा अपमानित केलं जातंय. मग आम्ही काय वेगळं सांगत होतो? की, भाजप हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी सावत्रपणाची वागणूक ती तर आहेच…’

हे ही वाचा >> New Parliament: नव्या संसद भवनाबाबत शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले मी…

‘पण या महाराष्ट्रातून शिवसेनेला खतम करण्याच्या भूमिकेतून काम करत होते म्हणून शिवसेना त्यांच्यापासून वेगळी झाली. भाजप हा एक अजगर किंवा मगर आहे. आतापर्यंत जे-जे त्यांच्याबरोबर गेले त्यांना त्याने खाऊन टाकलं. फक्त आम्ही शिवसेना नाही..’ असं म्हणत राऊतांनी भाजपवर टीका केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘फुटलेल्या गटात पण दोन गट पडलेत…’

‘आता त्यांना अनुभव येतोय.. आणि त्यांना हळूहळू कळेल. की, शिवसेना पक्षप्रमुख आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य होती. या मगरीपासून दूर जाण्याची. माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार.. हा जो फुटलेला गट आहे त्यांच्यामध्ये अस्वस्थतता, नाराजी आहे. झालेल्या गटात दोन गट पडले आहेत.’ अशी टीका राऊतांनी शिंदे गटावर केली आहे.

…म्हणून आम्ही भाजपपासून दूर गेलो!

‘पण कीर्तिकर यांनी जे सांगितलं तीच भूमिका पहिल्यापासून शिवसेनेची होती आणि तीच चीड असल्याने आम्ही भाजपपासून दूर गेलो. त्यांनी दिलेले शब्द पाळले नाहीत. सत्येत असताना आपल्या लोकांना निधी मिळू दिला नाही. शिवसेनेच्या आमदारांची कामं अनेक ठिकाणी रखडून ठेवली आहेत त्यावेळेला. अनेक शब्द दिले होते.. केंद्रापासून ते अगदी महाराष्ट्रपर्यंत. शिवसेनेच्या प्रमुख लोकांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला. सत्तेत समान भागीदारी, वाटेकरी असून सुद्धा शिवसेनेला महत्त्व द्यायचा प्रयत्न केला नाही. अशावेळी स्वाभिमानासाठी.. महाराष्ट्राच्या आणि पक्षासाठी उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतली. जी सर्वांशी चर्चा करून घेतली.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> CCTV: शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाला जागीच केलं ठार, उल्हासनगर हादरलं!

‘भाजपने कोंबड्यांचा खुराडा पाळलाय. म्हणजे एक-एक कोंबडी कापायला..’

‘तेच गजाभाऊ कीर्तिकर सांगतायेत की, आम्हाला लाथा घालतायेत.. आम्हाला नीट वागवत नाही.. आम्हाला सासूरवास होतोय. आम्हाला खतम करण्याचा प्रयत्न होतोय. हे तेच सांगतायेत. म्हणजे भाजपने त्यांचा मूळ स्वभाव सोडलेला नाही. जर गजाभाऊ कीर्तिकरांसारखा आमचा जुना सहकारी तिथे जाऊन पण सुखी नाही म्हणजे काल मी म्हणालो की, भाजपने हा कोंबड्यांचा खुराडा पाळलाय. म्हणजे त्यांनी एक-एक कोंबडी कापायला सुरुवात केली आहे.’ अशा घणाघाती शब्दात संजय राऊतांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT