‘अजित पवार चार महिन्यात तुरुंगात जाणार’, शालिनीताईंनी थेट दावाच केला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Deputy Chief Minister Ajit Pawar and Shalinitai Patil claimed that he will go to jail after four months
Deputy Chief Minister Ajit Pawar and Shalinitai Patil claimed that he will go to jail after four months
social share
google news

Shalinitai Patil: राज्यातील राजकीय वातावरण वेगवेगळ्या मुद्यांनी ढवळून निघाले आहे. सत्तांतर, पक्ष प्रवेश अशा घटनांमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. त्यातच विरोधी पक्षनेते पदी असलेले अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस (Shinde Fadnavis) सरकारमध्ये प्रवेश करत उपमुख्यमंत्री पदावर अजित पवार (DCM Ajit Pawar) विराजमान झाले. अजित पवारांनी भाजपसोबत जात सत्तेत सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. त्यामुळे पवार-पवार असा अंतर्गत कलहही वाढला. हा कलह वाढत असतानाच मजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (Former CM Vasantdada Patil) यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनीही सत्तांतर आणि पक्षफुटीवरून अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला. त्यांच्यावर टीका करताना अजित पवार पुढच्या चार महिन्यात तुरुंगात जातील असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजी आहे. शालिनीताई पाटील यांनी त्यांच्यावर टीका करत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही मोठा दावा केला आहे.

ADVERTISEMENT

फायद्यासाठी भाजपसोबत

शालिनीताई पाटील त्यांच्या सडेतोड भूमिकेमुळे त्या सर्व राज्याला परिचित आहेतच मात्र यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत ते पुढच्या चार महिन्यात तुरुंगात जातील असा दावा केल्याने आता त्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. यावेळी त्यांनी अजित पवार यांनी स्वार्थी राजकारण करत स्वतःच्या फायद्यासाठी ते भाजपसोबत गेले असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला. तसेच स्वतः उपमुख्यमंत्री होण्यासाठी उतावीळ असल्याने त्यांनी भाजपला साथ दिल्याचाही त्यांनी गंभीर आरोप केला आहे.

हे ही वाचा >>मनोज जरांगेंचा भुजबळांवर पलटवार, ‘पाय तोडण्याची भाषा करणाऱ्यांनी आम्हाला…’,

स्वार्थासाठी बंड

शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका करतान ते भाजपसोबत फक्त आपल्या फायद्यासाठी गेले असल्याचे सांगत. त्यांचे आणि शरद पवारांनी केलेल्या बंडामध्ये फरक असल्याचे सांगत. शरद पवारांनी आपल्या आमदारांसाठी बंड केले होते, तर अजित पवारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

अजितदादा तुरुंगात जातील

अजित पवार सध्या भाजपसोबत गेले असले तरी ते पुढील चार महिन्यात तुरुंगात जातील, त्यामुळे ते मुख्यमंत्री होण्याची शक्यता अजिबात नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अजित पवार ज्या वेळी तुरुंगात जातील त्यावेळी तिथे त्यांना कोण भेटायलाही जाणार नसल्याचे सांगत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

ADVERTISEMENT

फडणवीसच मुख्यमंत्री

अजित पवार सध्या भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री झाले असले तरी आगामी काळात म्हणजेच 2024 साली ते कोणत्याही परिस्थिती मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत असंही त्यांनी सांगितले. कारण 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली.

ADVERTISEMENT

सरकार चालवण्यात मुख्यमंत्री अपयशी

शालिनीताई पाटील यांनी एकाच वेळी अजित पवारांसह त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत त्या म्हणाल्या की आगामी काळात एकनाथ शिंदेही मुख्यमंत्री होणार नाहीत कारण ते स्वतःच बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडून बाहेर गेले आहेत, आणि ते केवळ सत्तेसाठी तिकडे गेले असून एकनाथ शिंदे सरकार चालवण्यात अपयशी ठरत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

हे ही वाचा >>Amol Kolhe : अजित पवारांचं चॅलेंज, कोल्हेंना शरद पवारांचा ‘मेसेज’, काय झाली चर्चा?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT