India Today conclave mumbai : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलणार? फडणवीसांचं थेट उत्तर; म्हणाले…
राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून मुख्यमंत्री बदलणार अशी जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगत अजून याबाबत निर्णय बाकी आहे मात्र सध्या तरी राज्याचे नेतृत्व हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करतील असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी आज इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये (India Today conclave) राज्याच्या कारणावर बोलत असताना शिवसेने (Shivsena) आणि भाजपच्या युतीबाबत बोलत त्यांनी शिवसेनेने विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटावर टीका करत असताना 2019 मध्ये सरकार स्थापन करताना त्यांनी फक्त 4 जागांसाठी आमच्याबरोबरची नैसर्गिक युती तोडली असल्याचेही त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
सीएम पदाचा दावेदार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये मुख्यमंत्री पदाविषयी आणि भविष्यातील निवडणुकांचे नेमके ध्येय धोरण काय हे सांगताना त्यांनी राज्यातील युती सरकारबाबतही अनेक गोष्टी दिलखुलासपणे सांगितल्या. यावेळी त्यांनी राज्यातील राजकारणावर बोलताना मुख्यमंत्री पदाचा दावेदार आणि त्या पदासाठी अजित पवारांच्या चर्चेत असलेल्या नावावरून त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सध्या राज्याचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य दिशेने वाटचाल चालू आहे. त्यामुळे सहा महिन्यात मुख्यमंत्री बदलणार हा चाललेल्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला.
हे ही वाचा >> “शरद पवारांनीच राष्ट्रपती राजवट लावायला सांगितलं”, देवेंद्र फडणवीसांनी फोडला बॉम्ब
नेतृत्त्व एकनाथ शिंदेंचेच
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकीय वर्तुळात सध्या मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु असली तरी त्याबाबत सध्या कोणताही निर्णय होणार नाही. कारण राजकारणात सहा महिन्यात असा कोणताही सहज बदल होत नाही. त्यामुळे आगामी काळातील कोणत्याही निवडणुका असल्या तरी त्या निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
अजित पवार मुख्यमंत्री…
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री बनणार अशी चर्चा सुरु आहे. त्यावर बोलतानाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सहा महिन्यात असा कोणताही सहजा सहजी बदल होत नाही. मात्र ज्यावेळी कधी अजित पवारांना मुख्यमंत्री बनवायची संधी मिळेल त्यावेळी त्यांना सहा महिन्यासाठी नाही तर पूर्ण पाच वर्षासाठीच मुख्यमंत्री बनवले जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा >> Devendra Fadnavis : ‘अजित पवारांना युतीत घेतलं, कारण…’, फडणवीसांनी दिलं उत्तर
मुख्यमंत्री शिंदेच
अजित पवारांना फक्त सहा महिन्यासाठी मुख्यमंत्री बनवणार नाही तर पाच वर्षासाठी त्यांना मुख्यमंत्री बनवले जाईल. मात्र सध्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि पुढंही सहा महिने तेच मुख्यमंत्री राहणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT