Satara: उदयनराजे भोसले राजकारणातून होणार निवृत्त? चक्क शरद पवारांनाही दिला सल्ला!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

BJP's Rajya Sabha MP Udayanraje Bhosale made a special comment on the political situation and the split between the two factions in the NCP.
BJP's Rajya Sabha MP Udayanraje Bhosale made a special comment on the political situation and the split between the two factions in the NCP.
social share
google news

Udayanraje Bhosle : महाराष्ट्राच्या राजकीय (Maharashtra Politics) पटलावर सध्या एकामागून एक थक्क करणाऱ्या घटना घडत आहेत. यावेळी राजकीय परिस्थितीवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटातील फुटीवर भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी विशेष भाष्य केले. त्यांनी 13 ऑक्टोबर रोजी साताऱ्यात पत्रकार परिषद घेत काही मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त केलं आहे. तसंच शरद पवारांनाही उदयनराजे भोसलेंनी खास सल्ला दिला. (Is MP Udayanaraje Bhosle will not Contest the Loksabha Election He Gave Special advice to Sharad Pawar)

ADVERTISEMENT

उदयनराजेंनी शरद पवारांना कोणता खास सल्ला दिला?

सध्याची परिस्थिती पाहता शरद पवारांनी निवृत्त व्हावे असे आपणास वाटते का? पत्रकारांनी, उदयनराजेंना हा प्रश्न विचारला असता यावर ते म्हणाले, ‘ नाही, पण त्यांनी खरंतर मार्गदर्शक म्हणून भूमिका निभवावी, असं माझं स्पष्ट मत आहे. पवार साहेबांनी सल्लागार म्हणून काम करावे, या भूमकेत त्यांनी असणे गरजेचे आहे. शरद पवार राज्यात अनेक वेळा मुख्यमंत्री, केंद्रात संरक्षण मंत्री राहिलेले आहेत.

Mumbai Crime Cocaine: नको त्या ठिकाणी लपवले कोकेन, आफ्रिकन महिलांचा अजब प्रताप

त्यामुळे त्यांनी सल्लागाराच्या भूमिकेत असणे जास्त गरजेचे आहे. तसेच काही गोष्टींचे ज्ञान आपल्याला पुस्तकातून मिळत नाही. अनुभव हा सगळ्यात मोठा शिक्षक असतो. त्यांचा अनुभव पाहता सर्वांना वाटतं की त्यांचा सल्ला घ्यावा.’ असंही उदयनराजे भोसले म्हणाले.

हे वाचलं का?

उदयनराजे भोसले यांचा लोकसभेची निवडणूक न लढवण्याचे संकेत?

तसंच एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ‘माझी निवडणूक लढण्याची खाज भागली आहे. बघता बघता पन्नाशी कधी ओलांडली हे समजलंच नाही. राजकारणात निवृत्तीचं पण वय असलं पाहिजे. शरद पवार यांनी देखील आता मार्गदर्शकाची भूमिका बजावावी असा सल्ला दिला.

IND Vs PAK: भारत-पाक सामन्याला उरले अवघे काही तास, ‘इथे’ पाहाता येईल Free सामना

शासनात निवृत्तीचं वय असतं तसं राजकारणातही निवृत्तीचं वय असलं पाहिजे. राजकारण्यांनाही हे लागू झालं पाहिजे. किती दिवस राजकारण करायचं अखेर, प्रत्येकप्रोफेशनला वय असतं आम्ही नेहमी म्हणतो तरुणांना संधी दिली पाहिजे. पण, यावेळी बाजूला बसायचा विचार करायचा मात्र पुन्हा उभं राहायचं आणि म्हणायचं लोकांचा आग्रह होता म्हणून मी निवडणूक लढतो, पण हे कुठेतरी थांबायला हवं.’ या वक्तव्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडणूक न लढवण्याचा हा इशारा दिला असल्याचं म्हटलं जात आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT