महाविकास आघाडीची तातडीची बैठक, जयंत पाटलांनी सांगितलं काय ठरली स्ट्रॅटजी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mahavikas aghadi meeting on sharad pawar silver oak jayant patil told the strategy
mahavikas aghadi meeting on sharad pawar silver oak jayant patil told the strategy
social share
google news

कर्नाटक विधानसभा निवडणूकीत कॉंग्रसने भाजपचा सूपडा साफ करत मोठा विजय मिळवला. कर्नाटकातील कॉंग्रेसच्या या विजयानंतर देशातील विरोधी पक्षांना मोठ बळ मिळालंय. तसेच कर्नाटकमध्ये करीश्मा आता इतरही राज्यात घडू शकतो असा विश्वास विरोधी पक्षांना बसला आहे. याच धऱतीवर आज महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्ह्वर ओक या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यासह पत्रकारांना दिला. (mahavikas aghadi meeting on sharad pawar silver oak jayant patil told the strategy to press)

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडलीय. या बैठकीत उद्धव ठाकरे, नाना पटोले,जयंत पाटील, संजय राऊत, सुप्रिया सुळे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाई जगताप, जितेंद्र आव्हाड यासांरखे प्रमुख नेते उपस्थित होते.या नेत्यांमध्ये साधारण तासभर बैठकीत चर्चा झाली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी बैठकीचा तपशील सांगितला. कर्नाटकमधील भाजपच्या पराभवाचा या बैठकीत आढावा घेतला गेला. भ्रष्टाचार, यंत्रणांचा गैरवापर, स्थानिकदृष्ट्या जनतेला आलेले अनुभव या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

हे ही वाचा : ‘मविआ बैठकी’त शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले कर्नाटकने…

जागा वाटपाबाबत काय निर्णय झाला?

महाविकास आघाडीतील तीनही पक्ष मिळून आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवणार आहोत. या निवडणूकीच्या जागा वाटपाबाबत पक्षाचे प्रमुख नेते लवकरच एकत्र बसून चर्चा करणार आहेत. राज्यातील इतर पक्ष, आघाडीतील घटक पक्षानाही बोलावून चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.आगामी निवडणूकीत महाविकास आघाडी सारखा एक ठाम पर्याय जनतेला देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या मुद्यावर बैठकीतील सर्व नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती जयंत पाटील यांनी यावेळी दिली. महाविकास आघाडी कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासास पात्र ठरून अगदी मोठ्या संख्येने ताकदीने काम करेल, असा विश्वास देखील जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

हे वाचलं का?

सुप्रीम कोर्टाच्या निकालावर काय म्हणाले?

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला. या निकालावर बैठकीत तिन्ही पक्षाच्या नेत्यांची साधक बाधक चर्चा झाली. सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना जी जबाबदारी दिली आहे.याबाबतीच पुढे कोणत्या गोष्टी होणार आहेत, याबाबत देखील चर्चा करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. राज्यात उन्हाळा प्रचंड असल्याने आम्ही वज्रमुठ सभा प्रलंबित ठेवल्या आहेत. जुनमध्ये पावसाला कमी झाल्यानंतर सभा घेण्याचा विचार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

हे ही वाचा :  डीके शिवकुमार यांचे भाकीत ठरलं खरं! 128 दिवसांपूर्वी म्हणाले होते…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT