गिरीश महाजनांची बैठक निष्फळ, मनोज जरांगे आंदोलनावर ठाम, सरकारसमोर ठेवले दोन पर्याय

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

maratha reservation manoj jarange continue agitation after meet girish mahajan nitest rane refuse offer
maratha reservation manoj jarange continue agitation after meet girish mahajan nitest rane refuse offer
social share
google news

महायुती सरकारच्या वतीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार नितेश राणे आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी आज जालन्याच्या अंतरावली गावात जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र गिरीष महाजन यांची ही बैठक निष्फळ ठरली आहे. कारण मनोज जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. तसेच त्यांनी आता सरकारला दोन पर्याय दिले आहे. या पर्यावावर सरकार काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (maratha reservation manoj jarange continue agitation after meet girish mahajan nitest rane refuse offer)

ADVERTISEMENT

गिरीश महाजन आणि मनोज जरांगे यांच्यात साधारण तासभर चर्चा झाली. या चर्चेनंतर गिरीश महाजन यांनी जरांगे यांच्याकडे एक महिन्याची मुदत मागत, त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र मनोज जरांगे उपोषणावर ठाम असून त्यांनी आता सरकारला दोन पर्याय दिले आहेत. सरकारने पुढील दोन दिवसांत मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र द्यावं, त्यासाठी कोणत्याही समितीच्या अभ्यासाची गरज नाही. आणि उर्वरीत महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आम्ही सरकारला तीन महिन्याची मुदत देऊ, असे जरांगे यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : Rajasthan News : ती ओरडत होती पण…, गर्भवती पत्नीची गावातून काढली नग्न धिंड

टीव्ही 9 शी बोलताना जरांगे म्हणाले की, सरकारला आम्ही वेळ दिला होता, परंतू आमच्यावर अशी वेळ येऊन ठेपली आहे की, आम्हाला आमच्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांना मुदतवाढ देता येत नाही आहे. कारण आता भरती खूप निघाल्या आहेत. या भरत्या मराठ्यांचं राखीव आरक्षण ठेवल्याविणाच भरल्या जात आहेत. त्यामुळे सरकारने आमची विनंती मान्य करावी, सरकारने दोन दिवसात आम्हाला निरोप पाठवावा,अध्यादेश घेऊनच गिरीश महाजनांनी यावे, आम्ही त्यांचे स्वागत करु आणि उर्वरीत महाराष्ट्रासाठी मात्र त्यांना तीन महिन्याचा वेळ दिला आहे,असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बैठकीत काय चर्चा झाली?

गिरीश महाजन म्हणाले, मनोज जरांगेची मागणी न्याय आहे, पण त्यांनी आम्हाला एक महिन्याची वेळ द्यावी,अशी सरकारची मागणी आहे. मात्र मनोज जरांगे यांनी दोन दिवसात निर्णय घेण्यास सांगितले आहे. पण मला वाटतं याला कुठे कायदेशीर आधार राहणार नाही. कारण जर आपण बळजबरीने जीआर काढला, तर तो एक दिवसावर टीकणार नाही. अन्यथा कुणी कोर्टात गेले तर तो रिजेक्ट होईल. त्यामुळे आपल्याला जर खरंच कायमस्वरूपी न्याय द्यायचा असेल, दोन दिवसाचा आग्रह धरू नका,असे आवाहन गिऱीश महाजन यांनी केले आहे.

आम्ही चार वर्ष मेहनत घेतली, हायकोर्टात टीकलो, सरकार बदललं आणि लगेच त्याची काय अवस्था झाली, सुप्रीम कोर्टाने फेटाळलं, असे देखील गिरीश महाजन यांनी सांगितले. त्यामुळे आम्हाला एक महिन्याची वेळ द्यावी, समीतीसमोर पुन्हा आपलं म्हणण मांडू आणि आपली बाजू मांडून हक्क मिळवून देऊ असे आश्वासन गिरीश महाजन यांनी मनोज जरांगेला दिले आहे.आपण तब्येतीची काळजी घ्यावी, थोडा वेळ आम्हालाही द्यावा. आम्ही पाठपुरावा करून मुंबईत थांबून हा विषय तडीस नेऊ,असे देखील गिरीश महाजन यांनी मनोज जरांगेना आश्वासन दिले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Pune crime : जेवण बनवण्यावरून झाला वाद, नंतर कोयत्याने वार करुन…

    follow whatsapp

    ADVERTISEMENT