‘उद्धवला आण, बघतो कसा येतो तो,’नारायण राणेंचे थेट आव्हान
Narayan Rane criticize Sanjay Raut : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत ‘उद्धवला आण, बघतो कसा येतो’, असे थेट आव्हानच दिले आहे. या आव्हानानंतर राणे आणि ठाकरेंमध्ये कोकणात वाद पेटण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
Narayan Rane criticize Sanjay Raut :रत्नागिरीच्या राजापूर येथील प्रस्तावित बारसू रिफायनरीवरून (Barsu Refinery) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्यावरून आता एकमेकांचे कट्टर विरोधक राणे आणि ठाकरे एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. कारण संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळीच उद्धव ठाकरे बारसूत जाणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray)एकेरी उल्लेख करत ‘उद्धवला आण, बघतो कसा येतो’, असे थेट आव्हानच दिले आहे. या आव्हानानंतर राणे आणि ठाकरेंमध्ये कोकणात वाद पेटण्याची शक्यता आहे. (narayan rane criticize uddhav thackeray sanjay raut on basru refinery)
ADVERTISEMENT
काय म्हणाले नारायण राणे?
कोण वैभव नाईक मला गल्लीतल्या माणसाला उत्तर द्यायला आवडत नाही, उद्धव ठाकरेंनी बोलावं, विकासाच्या आड जर कोणी आला तर त्याला मी सोडणार नाही, असा सज्जड दमच नारायण राणे यांनी दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी मोर्चा काढावा, मी रिफायनरी समर्थनिय मोर्चा काढणार, बघया आपण होऊन जाऊ दे, अशी प्रतिक्रिया नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिली आहे.
हे ही वाचा : …तर देवेंद्र फडणवीसांचा सत्कार करू : संजय राऊत
एअरपोर्टला विरोध, कोणताही प्रकल्प आला की विरोध, कसा कोकणाचा विकास होणार?असा सवाल नारायण राणे यांनी केला. एकावेळी म्हणायचे कोकणाचा कॅलिफॉर्निया करू,त्या कॅलिफॉर्नियात असे 14 प्रकल्प आहेत. आज कोकणी तरूणांना नोकऱ्या पाहिजेत, रोजगार नाहीये असे देखील नारायण राणे (Narayan Rane) यांनी नमूद केले.
हे वाचलं का?
जैतापूरसाठी पाचशे कोटीचे डील झाली होती.यात नारायण राणेंनी (Narayan Rane) पन्नास टक्के म्हणजे अडीचशे कोटी घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.या आरोपावर नारायण राणे म्हणाले,संजय राऊतला दुसरे काय माहिती आहे. मी विधानसभेत हा प्रश्न लावून धरला, आणि विधानसभेत मी आरोप केला आहे. संजय राऊतला काय कामधंदा नाही, काय पण पुडी सोडायला, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. दरम्यान हवं तर प्रोसिडिंग काढून पहा विधानसभेचा रेकॉर्ड तुम्हाला मिळेल अशी प्रतिक्रिया नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिली.दरम्यान आता नारायण राणे यांच्या ठाकरेंना दिलेल्या थेट आव्हानानंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : विरोध नसतानाही वेदांता फॉक्सकॉन,एअरबस प्रकल्प….,संजय राऊतांचा रोखठोक सवाल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT