New Parliament: नव्या संसद भवनाबाबत शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले मी…
Sharad Pawar on New Parliament: देशाच्या नव्या संसद भवनाचं रविवारी उद्घाटन होणार आहे. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. पाहा शरद पवार नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT
Sharad Pawar: नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेलं नवं संसद भवन (New Parliament) हे आता पूर्णपणे तयार झालं असून उद्या (28 मे) त्याचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मात्र, असं असताना देशभरातील अनेक विरोधी पक्षांनी या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. ज्याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील आज मोठं विधान केलं आहे. (ncp chief sharad pawar said clearly that he will not go to the inauguration ceremony of the new Parliament building)
ADVERTISEMENT
पाहा शरद पवार नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाबाबत काय म्हणाले:
‘नवी वास्तू बांधणार हे सुरुवातीला आम्ही वर्तमानपत्रात वाचलं. असा महत्त्वाचा निर्णय घेताना संसदेच्या सदस्यांना विश्वासात घेण्याची आवश्यकता होती. एक विषय आहे की, भूमीपूजन आहे.. त्यासाठी कोणाला विश्वासात घेतलं नाही. आता संसद तयार झालं आहे तर मागणी अशी होती की, संसदेची सुरुवात ही नेहमी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होते. जर ही पद्धत आहे तर त्याचं उद्घाटन राष्ट्रपतींनी करावं. तेही मान्य केलेलं नाही.’
‘उद्घाटनाचा कार्यक्रम ठरला त्याचीही चर्चा कधी केली नाही. त्यामुळे कोणाला विश्वासात न घेता हे जे सगळे निर्णय घ्यायचे असतील तर विरोधी पक्षातील काही वरिष्ठ सहकाऱ्यांनी अशी भूमिका घेतली की, आपण जाऊ नये. त्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे.’ असं म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
कोणते पक्ष विरोधात, कोणते एकत्र?
21 विरोधी पक्षांनी संसदेच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. या पक्षांमध्ये काँग्रेस, द्रमुक (द्रविड मुनेत्र कळघम), आप, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, सीपीआय, जेएमएम, केरळ काँग्रेस (मणी), विदुथलाई चिरुथाईगल काची, रालोद, टीएमसी, जेडीयू, एनसीपी, सीपीआय (M), RJD, AIMIM, AIUDF (ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट), इंडियन युनियन मुस्लिम लीग, नॅशनल कॉन्फरन्स, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी आणि मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम (MDMK) यांचा समावेश आहे.
हे ही वाचा >> Crime: पोलीस महिलेसोबत लव्ह, सेक्स, अन्.. इंस्टाग्राममुळे घडली आयुष्यभराची अद्दल
या पक्षांनी स्वीकारले निमंत्रण
भाजप, शिवसेना (शिंदे गट), नॅशनल पीपल्स पार्टी, राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी, सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा, राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी, अपना दल – सोनीलाल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, तमिळ मनिला काँग्रेस, एआयएडीएमके, एजेएसयू (झारखंड), मिझो नॅशनल आघाडी, YSRCP, TDP, BJD, BSP, JDS, शिरोमणी अकाली दल यांचा समावेश आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> CCTV: शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाला जागीच केलं ठार, उल्हासनगर हादरलं!
सर्वोच्च न्यायालयाचाही धक्का
दरम्यान, या प्रकरणी दाखल करण्यात आलेली जनहित याचिका शुक्रवारीच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ज्यामध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी लोकसभा सचिवालय आणि भारत सरकारला नवीन संसदेचे उद्घाटन करण्याचे निर्देश मागितले होते. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळताना याचिकाकर्त्याला फटकारले आहे. न्यायालय म्हणाले, ही याचिका का दाखल करण्यात आली हे आम्हाला माहीत आहे? आम्ही तुम्हाला दंड करत नाही याबद्दल आभार माना.
ADVERTISEMENT