Nilesh Rane : राणेंच्या पुत्राचा ‘राजकीय संन्यास’; नीलेश राणेंनी का सोडलं राजकारण?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी राजकारणातून संन्यास घेतला. नीलेश राणे यांनी ट्विट करून राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.
ADVERTISEMENT

Nilesh Rane Latest Tweet : ‘आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही’, असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. दसऱ्याच्या दिवशीच नीलेश राणे यांनी ही घोषणा केल्यानं कोकणातील राजकीय वर्तुळात राजकीय भूकंप झाला आहे. कुडाळ मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच नीलेश राणेंनी राजकारणातून ब्रेक घेतल्याचे जाहीर केले. (Nilesh rane announced retirement from politics)
नीलेश राणे यांच्या पोस्टमध्ये काय? वाचा जशीच्या तशी…
नमस्कार,
मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे. आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही.
मागच्या 19/20 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं. कारण नसताना माझ्यासोबत राहिलात, त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. भाजपमध्ये खूप प्रेम भेटलं आणि भाजपसारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी खूप नशीबवान आहे.
हे ही वाचा >> “भाजप मला तुरुंगात टाकायला निघालं होतं”, हसन मुश्रीफांच्या विधानाने ‘खळबळ’
मी एक लहान माणूस आहे, पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले. आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही. टीका करणारे टीका करतील, पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा.
जय महाराष्ट्र!
हे ही वाचा >> अजितदादांचं वाढणार टेन्शन! शरद पवार-हर्षवर्धन पाटलांची भेट; राजकारण काय?
नमस्कार,
मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही.
मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम…
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 24, 2023
कुडाळमधून नीलेश राणेंच्या उमेदवारीची चर्चा
शिवसेनेतील फुटीनंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलली आहे. भाजप-शिवसेना युतीमुळे कोकणातील समीकरणं बदलली आहे. त्यात आता अजित पवार गटही सहभागी झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कुणाला तिकीट मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार, याबद्दल उत्सुकता वाढलेली आहे.
अशातच भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी एक मोठं विधान केलं होतं. ‘कुडाळचे पुढचे आमदार नीलेश राणे असतील. तुम्ही त्यांना साथ द्या’, असं म्हणत चव्हाणांनी नीलेश राणेंची उमेदवारीच जाहीर करून टाकली. पण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवी समीकरणं आकाराला येत असल्याचे दिसत आहे. राणेंची ताकद वाढण्याने राणे बंधू विरुद्ध सावंत बंधू असा राजकीय संघर्ष बघायला मिळू शकतो, अशी चर्चा होत आहे. पण, त्याआधीच नीलेश राणेंनी राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे.