Parliament Special Session: ‘ऐ @#%$…’ भाजप खासदाराची लोकसभेत दुसऱ्या खासदाराला शिवीगाळ

रोहित गोळे

ADVERTISEMENT

parliament special session using abusing language of bjp mp ramesh bidhuri in lok sabha opposition demands action bsp mp danish ali
parliament special session using abusing language of bjp mp ramesh bidhuri in lok sabha opposition demands action bsp mp danish ali
social share
google news

MP Ramesh Bidhuri: नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार रमेश बिधुरी (Ramesh Bidhuri) यांनी लोकसभेमध्ये बहुजन समाज पक्षाचे (BSP) खासदार दानिश अली (Danish Ali) यांना शिविगाळ करत अपशब्द वापरले आहेत. चांद्रयान-3 च्या संदर्भात बोलताना दानिश अली यांनी काही टिप्पणी केली. मात्र, त्यामुळे भाजप खासदार हे चांगलेच खवळले आणि त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह आणि असंसदीय असे शब्द वापरले. यावरुन केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी खेद व्यक्त केला. (parliament special session using abusing language of bjp mp ramesh bidhuri in lok sabha opposition demands action bsp mp danish ali)

ADVERTISEMENT

बिधुरींनी नेमकं काय म्हटलं?

दरम्यान, ‘रमेश बिधुरी यांनी काही आक्षेपार्ह म्हटले असेल तर ते रेकॉर्डमधून काढून टाकावे आणि मी याबद्दल खेद व्यक्त करतो.’ असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा >> Bhiwandi Murder : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा कटरने गळा चिरला, अन् आरोपीनं थेट…

रमेश बिधुरी यांच्या या विधानानंतर विरोधकांनी त्यांना फैलावर घेतले आहे. सोशल मीडियावर देखील यावरुन संताप व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी बिधुरी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अनेक नेत्यांनी ट्वीट करत याबद्दल संताप व्यक्त केला आहे तसेच बिधुरींविरोधात कारवाईची मागणीही केली आहे.

हे वाचलं का?

खासदार दानिश अली यांनी याबाबत लोकसभा अध्यक्षांना एक पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी असं लिहलं आहे की, ‘मी अल्पसंख्यांक समुदायातून असलो तरी या महान राष्ट्रात लोकशाही पद्धतीनं निवडून आलो आहे. हा प्रकार माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक असून या प्रकरणी आपण कडक कारवाई करावी आणि हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवावी.’ अशी मागणी दानिश अली यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Chandrayaan 3 ची मोठी बातमी, सिग्नलबाबत शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

बिधुरी यांच्या भाषणावेळी मागे हसत असलेले माजी आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि रविशंकर प्रसाद यांना देखील विरोधकांनी लक्ष्य केलं आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, या सगळ्या प्रकाराबात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील या सगळ्या प्रकाराबाबत रमेश बिधुरी यांच्याविरोधात संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्या कडक शब्दात समज देखील दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT