शिवसेनेच्या फुटीवर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंचे…”

मुंबई तक

ADVERTISEMENT

pm narendra modi reaction on shivsena split eknath shinde udhhav thackeray delhi nda meeting maharashtra politics
pm narendra modi reaction on shivsena split eknath shinde udhhav thackeray delhi nda meeting maharashtra politics
social share
google news

राज्यातील शिवसेना फुटीला नुकतंच वर्षपुर्ण झाले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी करून भाजपसोबत सत्ता स्थापण केली होती. या घटनेनंतर शिवसेना फुटली होती आणि महाविकास आघाडीचे सरकार पडले होते. या घटनेला वर्षपुर्ण झाले आहे. या शिवसेना फुटीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाष्य करून उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) चिमटा काढला आहे. (pm narendra modi reaction on shivsena split eknath shinde udhhav thackeray delhi nda meeting maharashtra politics)

ADVERTISEMENT

देशात आज दोन महत्वपुर्ण बैठकी पार पडल्या. देशातील विरोधी पक्षाची बंगळुरूत दुसरी बैठक पार पडली. त्यानंतर आता भाजपप्रणित एनडीएची बैठक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीला मुख्य़मंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. तसेच या बैठकीत देशभरातील 38 पक्ष सामील झाले होते. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधन केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी शिवसेना फुटीवर प्रथमचं भाष्य केले.

हे ही वाचा : INDIA : बंगळुरुतील बैठकीनंतर उद्धव ठाकरेंचा PM नरेंद्र मोदींवर ‘वार’, म्हणाले…

एनडीएच्या बैठकीतील भाषणाच्या सुरुवातीला नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा खरा अनुयायी आपल्यासोबत असल्याचे विधान केले आहे. त्याच्या या विधानाचा अर्थ इतकाच होता की, बाळासाहेब ठाकरे यांचा खरा अनुयायी आता एकनाथ शिंदे आहे. जो आता आपल्यासोबत आहे. एकूणच मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांचा खरा अनुयायी म्हणून नाकारल्याचा या विधानामागे अर्थ निघतोय. त्यामुळे एकनाथ शिंदे याने नाव घेऊन नरेंद्र मोदी यांनी ठाकरेंना चिमटा काढला आहे.

हे वाचलं का?

नरेंद्र मोदी यांनी एनडीएचा नव्याने अर्थ सांगितला. N-न्यु इंडिया,D- डेव्हलप नेशन, A- अॅस्पिरेशन आणि पीपल रीजन असा सांगितला. तसेच देशातला गरीब, मध्यमवर्ग, तरूण , महिला, सोशित, पीडित आणि आदिवासी सर्वांचाचा विश्वास एनडीएवर असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

राहुल गांधींवर मोदींची टीका

नरेंद्र मोदी यांनी यावेळी विरोधकांच्या आघाडीवरही टीका केली. एनडीए कोणत्याही विरोधासाठी किंवा कुणालाही सत्तेवरून खाली उतरवण्यासाठी बनली नाही आहे, पण जी आघाडी नकारात्मकतेतून बनते, ती कधीही यशस्वी होत नाही, असा टोला मोदी यांना विरोधकांना लगावला. तसेच एनडीएने सकारात्मकतेचे राजकारण केले नकारात्मकेचा रस्ता कधी धरला नाही. आम्ही विरोधात राहून सरकारचा विरोध केला, सरकारचे घोटाळे बाहेर काढले, पण कधीच जनतेच्या मतांचा अपमान केला नाही. आम्ही सरकारचा अपमान करण्यासाठी कधीही विदेशाची मदत नाही मागितली, अशी टीका देखील त्यांनी राहुल गांधीवर केली. जर आघाडी सत्तेच्या मजबूरीची असेल, भ्रष्टाचाराच्या उद्देशाने असेल, घराणेशाहीवर आधारीत असेल, जातीवादारून असेल तेव्हा ती आघाडी देशाचे नुकसान करते, अशी टीका मोदी यांनी विरोधकांवर केली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : INDIA vs NDA : रणनीती ठरली! 11 नेते, सचिवालय… आता मुंबईत बैठक

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT